नाशिक : पाणीटंचाईमुळे नवीन बांधकामांवर आलेले संकट व तत्कालीन आयुक्तांकरवी लादण्यात आलेल्या बांधकाम नियमावलीमुळे गेल्या दीड वर्षापासून आर्थिक गर्तेत सापडलेले बांधकाम क्षेत्र नवीन आयुक्तांच्या दिलासादायक आश्वासनामुळे आनंदले असून, विशेष करून या बांधकामांवर काम करणारे मजूर, गवंडी, सेंट्रिंग काम करणाऱ्या कामगारांच्या हाताला काम मिळण्याची अपेक्षा जागृत झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून शहर व परिसरातील नवीन बांधकामे, तसेच अपूर्णावस्थेतील बांधकामे ठप्प झाली असून, या कामांवर काम करणाऱ्या मजुरांवर अक्षरश: उपासमार ओढवली आहे. अपूर्णावस्थेतील बांधकामे ‘कपाटा’त अडकल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी ती कामे होती त्याच अवस्थेत बंद करून टाकली तर नवीन कामे करण्यासाठी महापालिकेची नियमावली आड येत असल्याने बांधकाम व्यावसायिकांचे धाडसच बळावत नव्हते. त्यामुळे या सर्व व्यवसायालाच अवकळा प्राप्त होऊन त्याचे परिणाम बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेले बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स, सेंट्रिंग कारागीर, स्लॅब टाकणारे, वीटकाम, मातीकाम करणारे मजूर, प्लंबर, रंगारी अशा विविध घटकांच्या रोजगारावर झाले.
तिढा सुटणार : पुन्हा रोजगार संधी
By admin | Updated: July 10, 2016 01:18 IST