शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

न्यायडोंगरीत आहेर कुटुंबीयातच एकवटणार सत्ता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 00:51 IST

न्यायडोंगरी : सरकारी दप्तरी अतिसंवेदनशील म्हणून नोंद असलेल्या तसेच जिल्ह्यातील राजकीय विश्लेषकांच्या नजरा लागून असलेल्या न्यायडोंगरी ग्रामपालिकेची निवडणूक कोणतेही गालबोट न लागता खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीत माजी आमदार अनिल आहेर यांच्या परिवर्तन पॅनलने १४ पैकी १२ जागांवर दमदार विजय मिळवला, तर शिवसेना पुरस्कृत नम्रता विकास पॅनलला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. बंजारा बहुल भागात त्याच समाजाने स्वतंत्र गट स्थापन करत ३ जागा मिळविल्या. अशा १७ सदस्य संख्या असलेल्या न्यायडोंगरी ग्रामपालिकेत सरपंचपदाचे आरक्षणाकडे लक्ष लागून असले तरी आहेर यांच्या कुटुंबीकडेच सरपंचपद जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्दे परिवर्तनचा झेंडा : यंदा सर्वसाधारण अथवा ओबीसी स्त्री आरक्षणाची शक्यता

तिरंगी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेमध्ये माजी सभापती विलास आहेर व शशिकांत मोरे या दोन गटांनी एकमेकांसमोर पॅनल निर्मिती केली तसेच उमेदवारी डावलेले कार्यकर्त्यांची नाराजी भोवल्याने शिवसेना पुरस्कृत पॅनलला पराभवाला सामोरे जावे लागले. परिवर्तन पॅनलकडे स्पष्टपणे बहुमत असल्याने पॅनलप्रमुख अनिल आहेर यांनी सरपंच आरक्षणाची प्रतीक्षा न करता ग्रामपालिका कार्यालयातील परिसराला बदल करण्यास सुरुवात केली आहे. पुढील वर्षी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच येणाऱ्या काळात सरपंचपदाची निवड व गावाचा कायापालट पाहायला मिळणार आहे. परिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारांच्या नजरा २८ जानेवारीला होणाऱ्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत. अनिल आहेर यांनी आपल्याच कुटुंबातच सरपंचपदाची माळ गळ्यात पडावी यासाठी कुटुंबातील तीन सदस्य निवडून आणले आहेत.गेल्या पंचवार्षिकमध्ये सरपंचपद ओ.बी.सी. पुरुषांसाठी आरक्षित होते. यावेळेस सर्वसाधारण स्त्री किंवा ओबोसी स्त्री आरक्षण निघण्याची शक्यता आहे तसे झाल्यास माजी सरपंच डॉ. शरद आहेर यांची कन्या पुणेकरांची सून असलेली पूजा आहेर यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडू शकते. तसेही सध्या चालुमितीस न्यायडोंगरी जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व नाशिकची सून करत आहे . सर्वसाधारणसाठी जर सरपंचपदाचे आरक्षण निघाले तर वॉर्ड क्र. ५ मधून निवडून आलेले आहेर यांचे पुतणे ॲड अमोल आहेर यांची दावेदारी नाकारता येणार नाही. माजी सरपंच डॉ. राजेंद्र आहेर यांना अनुभवाच्या जोरावर पुन्हा सरपंचपदाची माळ मिळेल काय, याबाबतही उत्सुकता वाढली आहे. पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र आहेर हे सून भाग्यश्री आहेर यांची दावेदारी सांगू शकतात.हे आहेत विजयी उमेदवारवॉर्ड क्रमांक १ मध्ये नरेंद्र नीलकंठ आहेर, भाग्यश्री आकाश आहेर. वॉर्ड क्रमांक २ मध्ये डॉ. राजेंद्र रावसाहेब आहेर, दिलीप हरी जाधव, सोनाली किशोर साळुंके. वॉर्ड क्रमांक ३ मध्ये पूजा शरदचंद्र आहेर, जीवन फुलचंद दुगड , शोभा सुरेश पवार. वॉर्ड क्रमांक ४ मध्ये अशोक ताराचंद दळवी, सुशीला अहिरे, नंदा दत्तू लगडे .वॉर्ड क्रमांक ५ मध्ये अमोल भाऊसाहेब आहेर, नबाबाई धनराळ ,अरुणा शिवाजी शेवाळे.वॉर्ड क्रमांक ६ मध्ये संतोष बळीराम चव्हाण, सोपान गंगाराम राठोड, मनीषा सोमनाथ पवार हे उमेदवार विजयी झाले आहेत.पाच वर्षातच चढली पायरीमागील पाच वर्षात ७० वर्षाची सत्ता हातातून गेल्यानंतर माजी आमदार अनिल आहेर यांनी पुन्हा सत्ता स्थापन झाल्याशिवाय ग्रामपालिकेची पायरी चढणार नसल्याचा संकल्प केला होता. तो त्यांनी पाच वर्षातच पूर्ण केला . आहेर यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये पराभव झाल्यानंतर ग्रामपालिका कार्यालयात एकदाही पाय ठेवला नव्हता. आता पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित झाल्याने आहेरांचा वरचष्मा दिसून येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत