शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पतीपाठोपाठ पत्नीचेही निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:42 IST

सटाणा : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालेल्या पतीच्या मृतदेहाला मुलाने अग्निडाग देताच पत्नीचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची दु:खदायक घटना सटाणा शहरात घडली.

ठळक मुद्देअंजनाबाई यांची स्थिती पाहून महिलांनी भीतीने आरडाओरड

सटाणा : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालेल्या पतीच्या मृतदेहाला मुलाने अग्निडाग देताच पत्नीचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची दु:खदायक घटना सटाणा शहरात घडली.सटाणा नगरपालिकेचे कर्मचारी अजय धर्मराज पवार यांचे वडील धर्मराज रामचंद्र पवार (७५) यांचे शनिवारी दुपारी ११ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आपल्या पतीचे निधन झाल्याने अंजनाबाई पवार ११ वाजेपासून धाय मोकलून रडत होत्या. पती धर्मराज पवार यांचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी नातलगांनी वाहनात ठेवला असता पत्नी अंजनाबाई जिवाचा आकांत करून एकटे जाऊ नका, मलाही सोबत न्या.. तुमच्याशिवाय मी कशी जगू असे म्हणत रडत असताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते.सर्व कुटुंबीयांनी त्यांना धीर देत आता रडू नका असे सांगत मृतदेह येथील नवे अमरधाम येथे अंत्यसंस्कारासाठी आणला. मयत धर्मराज यांच्या मृतदेहाला त्यांची मुले अजय व प्रशांत यांनी सायंकाळी ६ वाजता अग्निडाग देताच धर्मराज यांच्यासोबत कधीकाळी सात जन्माच्या फेºय घेतलेल्या त्यांच्या पत्नी अंजनाबाई धर्मराज पवार (६८) यांनाही हृदयविकाराचा तीव्र झटका आला. सर्व पुरु ष मंडळी अंत्यविधीसाठी गेलेले असतांना अंजनाबाई यांची स्थिती पाहून महिलांनी भीतीने आरडाओरड केली. त्याचवेळी रस्त्यावरून जात असलेल्या एका कारला थांबवून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.पतीच्या मृतदेहाला अग्निडाग दिल्यानंतर पत्नीला आलेला हृदयविकाराचा झटका आणि त्यानंतर झालेले त्यांचे निधन शहरवासीयांना चटका लावून गेले. पती-पत्नीची एकाच दिवशी झालेली एक्झीट आणि एकाच दिवशी आई-वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची मुलांवर आलेल्या दुर्दैवी वेळ यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.