शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी, मित्रावर गोळीबार करणाऱ्यास सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 01:06 IST

चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व वाढदिवसासाठी घरी आलेल्या मित्रावर गोळीबार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी दीपक ऊर्फ सोनू अशोक परदेशी (रा़ साईराम रो-हाउस, म्हाडा कॉलनी, पाथर्डी शिवार) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ सी़ खटी यांनी सोमवारी (दि़२७) पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़

नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व वाढदिवसासाठी घरी आलेल्या मित्रावर गोळीबार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी दीपक ऊर्फ सोनू अशोक परदेशी (रा़ साईराम रो-हाउस, म्हाडा कॉलनी, पाथर्डी शिवार) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ सी़ खटी यांनी सोमवारी (दि़२७) पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ १८ आॅगस्ट २०१६ रोजी घडलेल्या या घटनेत सरकारी वकील कल्पक निंबाळकर यांनी न्यायालयात आठ साक्षीदार तपासून आरोपीविरोधात सबळ पुरावे सादर केले होते़  आरोपी दीपक परदेशी यास पत्नी कोमलच्या चारित्र्यावर संशय होता़ १८ आॅगस्ट २०१६ रोजी दीपकचा वाढदिवस असल्याने त्याचा मित्र नागेश्वर बंगाली ठाकूर (रा़शांतीनगर, माडसांगवी) हा मित्रांसह केक घेऊन रात्रीच्या वेळी पार्टी करण्यासाठी घरी गेला होता़ रात्री केक कापल्यानंतर सर्व मित्रांनी दारू घेतली व निघून गेले़ मात्र, ठाकूर हा परदेशीच्या घरीच थांबलेला होता़ परदेशीची पत्नी कोमल ही ठाकूर यास मामा मानत होती़ रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून दीपक याने पत्नी कोमलसोबत भांडण सुरू केले़  पती-पत्नीमधील भांडण विकोपाला गेल्यानंतर परदेशी याने बॅगमधून गावठी कट्टा काढून पत्नीवर एक तर ठाकूरवर दोन गोळ्या झाडल्या़ यामध्ये पत्नीच्या डोक्यात गोळी घुसल्याने ती गंभीर जखमी झाली तर ठाकूरच्या गळ्यास व गालास गोळ्या चाटून गेल्या़ यानंतर ठाकूर याने आरडाओरड केल्याने परदेशी यास पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले़

टॅग्स :NashikनाशिकFiringगोळीबार