शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 01:10 IST

मालेगाव कॅम्प : शहरात प्लॅस्टिकबंदी कायद्याचे नागरिकांकडून सर्रास उल्लंघन होत असून, जणू हा कायदा रद्द करण्यात आला अशा पद्धतीने प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. महापालिकेचे याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे.

ठळक मुद्देबंदी घालण्यात आलेल्या पिशव्यांचा वापर शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू

मालेगाव कॅम्प : शहरात प्लॅस्टिकबंदी कायद्याचे नागरिकांकडून सर्रास उल्लंघन होत असून, जणू हा कायदा रद्द करण्यात आला अशा पद्धतीने प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. महापालिकेचे याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे.

महापालिकेने गतदीड वर्षात याबाबत कोणतीही कारवाई केली नाही याचे शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे. प्लॅस्टिक वापरले असता होणाऱ्या दुष्परिणामुळे राज्यभरात शासनाकडून सरसकट बंदी आणली आहे व तसा कायदा लागू केला आहे. मालेगावी याची सुरुवातीला काहीशी अंमलबजावणी झाली व वापर करणाऱ्या संबंधिताना तंबी देण्यात आली. यामध्ये घाऊक प्लॅस्टिक व्यापाऱ्यांना याबाबत माहिती दिली व कायदेशीर प्रमाणित जाड बारीक मायक्रॉन मोजमाप असलेल्या पिशव्यांची खरेदी-विक्रीबाबत सूचना देण्यात आल्या. या प्रमाणित असलेल्या पिशव्या काही प्रमाणात महाग मिळतात, त्यामुळे बंदी घालण्यात आलेल्या पिशव्यांचा वापर शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.अनेक व्यापारी प्रतिष्ठाने, लहान-मोठे अनेक प्रकारची दुकाने, हातगाडीवर व्यवसाय करणारे, घरपोच सेवा देणारे विविध व्यावसायिकांकडून सर्वत्र प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. त्यामुळे वापर केलेल्या पिशव्या अनेकदा मोकळ्या जागी ठिकाणी टाकत असल्याने शहरात अनेक ठिकाणी बकाल स्वरूप आले आहे. काही ठिकाणी या प्लॅस्टिकमुळे गटारी तुंबलेल्या आहेत व शहरातून वाहणारी मोसम नदी या प्लॅस्टिक कचऱ्याचे अधिकने दूषित झाली असल्याचे पहायला मिळते.शहरात २०१९ सालात चारही प्रभागात काही कारवाई करीत जप्ती व आर्थिक दंड करण्यात आला तर गेल्या वर्षभरात कोरोना, लॉकडाऊन, संचारबंदी अशा वेगवेगळ्या निर्बंधांमुळे कारवाई झाली नाही त्यामुळे की काय; पण शहरात प्लॅस्टिकबंदी कायदा झाला नसल्याच्या अविर्भावात सर्रासपणे कमी दर्जाच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू आहे.पूर्वी लपूनछपून अशा पिशव्यांचा वापर सुरू होता; आता मात्र सर्रासपणे वापर सुरू असल्याने शहरास लवकरच याचे दुष्परिणाम भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर लवकर मालेगाव मनपाच्या आरोग्य विभागाने कठोरपणे कारवाई करण्याची मागणी होत आहे. (०३ मालेगाव)

 

 

 

टॅग्स :Malegaonमालेगांवnagaradhyakshaनगराध्यक्ष