शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीचे ‘ते’ संचालक राजीनामा का देत नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:58 IST

स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून स्मार्टरोडसह अन्य अनेक विषयांतून गोंधळ सुरू असताना कंपनीचे संचालक मात्र बैठकीत बोलत नाहीत आणि बाहेर येऊन या विषयावर टीका करतात.

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून स्मार्टरोडसह अन्य अनेक विषयांतून गोंधळ सुरू असताना कंपनीचे संचालक मात्र बैठकीत बोलत नाहीत आणि बाहेर येऊन या विषयावर टीका करतात. राजीनामा देऊ असे म्हणतात, मग राजीनामा का देत नाही, असा खडा सवाल कॉँग्रेसच्या प्रवक्त्या आणि ज्येष्ठ नगरसेवक डॉ. हेमलता पाटील यांनी केला आहे.स्मार्टरोडच्या रखडलेल्या कामावरून हेमलता पाटील यांनी सोमवारी (दि.२२) आंदोलनदेखील केले होते. मात्र त्यावेळी त्यांनी कंपनीच्या संचालकांवरदेखील टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याचे ठरवले आहे. परंतु मोदी यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या योजनेची वासलात लावण्याचा विडाच उचलला आहे. शहरात कामे करताना कोणती विकासकामे केली पाहिजे आणि त्याचा नाशिककरांना फायदा होणार आहे, याची माहिती नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना मिळत नाही. कालिदास कलामंदिर, नेहरू उद्यान, कलादालन या प्रकल्पांवर निविदेच्या पलीकडे जाऊन मोठा खर्च झाला आहे. ग्रीन सिटी प्रकल्प शेतकºयांवर लादण्यात आला आहे. पॅन सिटी व वॉटर सप्लाय प्रोजेक्ट यासंदर्भात सत्ताधिकारी पक्षाच्या आमदारांनीच बहिष्कार घालून या योजनांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. त्यातील स्काडा मीटर प्रकरणी कंपनी अध्यक्षांनी निविदा रद्द केल्यानंतर बैठकीतच त्या गैरसमजामुळे झाल्याचे सांगून हीच प्रक्रिया कार्यान्वित केली. ज्या संचालकांनी या प्रकल्पाला विरोध केला तेच संचालक या बैठकीस उपस्थित होते. काही संचालक स्मार्ट सिटीत भ्रष्टाचार होत असल्याचे सांगून राजीनाम्याची भाषा करतात. परंतु अद्यापपर्यंत कोणीही राजीनामा दिलेला नाही, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.बैठकीत विरोध न करण्याचे कारण काय?स्मार्ट सिटीच्या बैठकीस उपस्थित राहून विरोध करून तशी अधिकृत नोंद बैठकीच्या इतिवृत्तात करण्याऐवजी बाहेर माध्यमांसमोरच केवळ का चर्चा करतात, असा प्रश्न हेमलता पाटील यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी