शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस समोर दिसले की मास्क तोंडाला लावायचा, असे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 12:45 IST

ओझर (सुदर्शन सारडा) : पोलीस समोर दिसले की मास्क तोंडाला लावायचा हे का घडतंय? पोलिसांना बळाचा वापर का? करावा लागतो याचे उत्तर आपण तपासले तर ते आपणा सर्वांच्या आरोग्य सुदृढते साठीच आहे हे सर्वार्थाने सिद्ध होतं. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी वाढत्या कोरोनाच्या संख्येमुळे नागरिकांना भावनिक साद घालत नियमांचे पालन करण्याबरोबर स्वतःची काळजी घेण्या संदर्भात आवाहन केले आहे.

नाशिक पोलीस अधीक्षकांची जनतेला भावनिक सादओझर (सुदर्शन सारडा) : पोलीस समोर दिसले की मास्क तोंडाला लावायचा हे का घडतंय? पोलिसांना बळाचा वापर का? करावा लागतो याचे उत्तर आपण तपासले तर ते आपणा सर्वांच्या आरोग्य सुदृढते साठीच आहे हे सर्वार्थाने सिद्ध होतं. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी वाढत्या कोरोनाच्या संख्येमुळे नागरिकांना भावनिक साद घालत नियमांचे पालन करण्याबरोबर स्वतःची काळजी घेण्या संदर्भात आवाहन केले आहे. 'खरे म्हणजे आज माझ्या ग्रामीण जनतेला नम्र आवाहन करण्यासाठी आपल्याशी बोलत आहे. वाढते कोरोना संक्रमण, लॉकडाऊन,कायदा सुव्यवस्था,गावागावात होणारी प्रचंड गर्दी व त्यातून वाढणारा बधितांचा आकडा हा चिंतेचा विषय ठरू पाहत असताना त्याला आटोक्यात आणण्यासाठी आपली सर्वांची साथ लागणार आहे हे मात्र आज स्पष्ट करू इच्छितो.

---------------मास्क हेच कवचखरे तर अनेकांच्या परिवारातील कर्ते कोविडमुळे साथ सोडून गेले याचे शल्य आहेच.परंतु आपण काळजी कधी घेणार हे सर्वप्रथम मी आपणास विचारु इच्छितो ? आज घडीला मास्क हेच प्राथमिक कवच बनले आहे.ती खिशात घालून फिरण्याची वस्तू आहे का?असे अनेक लहान प्रश्न तुमच्या मनात असताना त्याचे उत्तर सर्वानाच माहीत आहे.मग हा हलगर्जीपणा का होतोय हा मूळ मुद्दा आहे.का म्हणून पोलीस कार्यवाहीची वाट बघावी? असा प्रश‌्न पाटील यांनी उपस्थित केला आहे.---------------------नियम पाळा, कारवाई टाळा...!आजपर्यंत अनेक आमच्या पोलीस बांधवांना,भगिनींना कोरोनाची लागण झाली, त्यातील अनेकांनी हे जग सोडलं.परंतु नागरिकांना सतर्कतेच्या कमानीत ठेवण्याचे काम आजही चोवीस तास अविरत सुरू आहे आणि ते कर्तव्य आम्ही एकसंघपणे करतच राहू.परंतु यात आपल्या सर्वांचीच साथ लागणार आहे.आज वाढणारी भीषण परिस्थिती बघितली तर कोरोनाची दुसरी लाट गंभीर असली तरी,पोलीस प्रशासन खंबीर आहे. कोरोनाचे समूळ उच्चटन करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र होऊ यात आणि नियमांच काटेकोर पालन करूया. कोरोनाचे नियम पाळा व कारवाई टाळा, असे पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक