शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
5
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
6
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
7
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
8
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
9
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
10
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
11
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
13
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
14
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
15
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
16
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
17
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
18
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
19
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
20
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'

पाण्यासाठी एकवटला सारा गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 22:38 IST

पेठ : शहरापासून साधारण पाच किमी अंतरावर तोंडवळ हे साधारण पाचशे लोकवस्तीच्या गावागावांत प्रवेश करताच प्रथम दर्शन होते ते रस्त्याच्या कडेला असलेल्या भव्य आणि खोल विहिरीचे. संरक्षण कठड्यासह बांधकाम केले असले तरी डोकावून पाहिल्यावर या विहिरीचे भयाण वास्तव दिसून येते.

ठळक मुद्देग्रामस्थांचे श्रमदान : तहानलेल्या तोंडवळकरांनी टॅँकरमुक्तीचा घेतला ध्यास

एस़आऱ शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : शहरापासून साधारण पाच किमी अंतरावर तोंडवळ हे साधारण पाचशे लोकवस्तीच्या गावागावांत प्रवेश करताच प्रथम दर्शन होते ते रस्त्याच्या कडेला असलेल्या भव्य आणि खोल विहिरीचे. संरक्षण कठड्यासह बांधकाम केले असले तरी डोकावून पाहिल्यावर या विहिरीचे भयाण वास्तव दिसून येते.विहिरीच्या तळाशी एक छोटासा खड्डा. त्यातून एकेक तांब्या पाणी सेंदण्यासाठी काठावर असलेल्या महिलांची सुरू असलेली कसरत. प्लॅस्टिक डबकी (पोहऱ्याच्या) साह्याने घोट घोट पाणी जमा करणाºया आदिवासी महिला रात्रंदिवस या विहिरीच्या काठावर तळ ठोकून असतात. ग्रामपंचायतीने ढोबळ या जुन्या विहिरीचे पुनर्भरण करून गावात छोट्याशा पाइपलाइनद्वारे गावातील विहिरीपर्यंत पाणी आणले; मात्र एप्रिलअखेर तीदेखील विहीर आटल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठीची भटकंती पुन्हा सुरू झाली. शासनाच्या टँकरपुरवठा निकषात गाव बसत नसल्याने तोही मार्ग बंद झाला. अखेर ग्रामपंचायतीने खासगी टँकरने गावाला पाणी पुरविण्याचा निर्णय घेतला; मात्र खर्चाचे बंधन असल्याने पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करताना ग्रामपंचायत प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. सध्या लग्नसराई जोरात असल्याने घरी लग्न कार्य असल्यास विकत पाणी आणून लग्नकार्य पार पाडण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे.पाण्यासाठी गावाचे सामूहिक प्रयत्नतोंडवळ गावच्या तीव्र पाणीटंचाईच्या बातम्या वर्तमानपत्रातून व समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्याचे पाहून नाशिक जिल्ह्यात पाणीप्रश्नावर भरीव काम करणाºया सोशल नेटवर्किंग फोरमच्या टीमने तोंडवळ गावाला भेट देऊन पाहणी केली. वर्षानुवर्ष पाणीटंचाईच्या चटक्यांनी भाजून निघालेल्या तोंडवळ वासीयांना आशेचा किरण दिसला. झाडून सारा गाव एकत्र झाला. ग्रामस्थांचे श्रमदान, संस्थेची मदत व ग्रामपंचायतीचे सहकार्य अशा त्रिशंकू पद्धतीने तोंडवळ गावात कायमस्वरूपी जलप्रकल्प राबविण्यासाठी योजना आखण्यात आली. आणि बघता बघता गावातील पुरु षांसह बायाबापड्यांनी डोक्यावरचा हंडा खाली ठेवत कुदळ फावडे खांद्यावर घेतले. गावाच्या बाजूला असलेल्या खोल दरीत कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत बघून गावकऱ्यांनी विहीर खोदण्यास सुरु वात केली आहे. सोशल नेटवर्किंग फोरमच्या वतीने वीजपंप, पाइपलाइन व अन्य खर्च करण्यात येणार असून, ग्रामपंचायत पाण्याची टाकी बांधून देणार आहे. गत अनेक वर्षापासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाºया तोंडवळवासीयांना या जलाभियानामुळे कायमची मुक्ती मिळणार असून, यासाठी गावातील प्रत्येकाने कंबर कसली आहे. तोंडवळ गावात ग्रामपंचायतीमार्फत टंचाई उपाययोजना म्हणून जुनी ढोबळ विहीर खोलीकरण करण्यात आली; पण यावर्षी उष्णतेची दाहकता जास्त असल्याने यातीलदेखील पाणी आठ दिवसांत संपले. यामुळे शेवटी आम्ही ग्रामपंचायतीमार्फत पाण्याचा टॅँंकर सुरू करण्यात आला. सध्या खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गाव उंचावर वसलेले असल्याने उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पडतात. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होते.- यशोदा चौधरी, सरपंच, तोंडवळ तोंडवळ गाव उंचावर वसलेले असल्याने उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पडतात. यावर्षी पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला; मात्र एप्रिल अखेर तेही पाणी बंद पडल्याने सध्या खासगी टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा केला जात आहे. सोशल नेटवर्किंग फोरमने तोंडवळ जलप्रकल्प हाती घेतला असून, कायमस्वरूपी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- प्रवीण सुरसे, ग्रामसेवक, तोंडवळ ग्रामस्थ म्हणतात....ग्रामपंचायत तोंडवळमार्फत प्रत्येक वर्षी टंचाईकाळात उपाययोजना केली जाते; परंतु येणाºया प्रत्येक वर्षी दुष्काळाच्या झळा वाढतच आहे, त्यामुळे आम्ही गावात सर्व ग्रामस्थ यांची बैठक घेऊन गावापासून २/३ किमी. अंतरावर श्रमदानातून विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. सोशल नेटवर्किंग फोरम सामाजिक संस्था व ग्रामपंचायत तोंडवळ यांच्या संयुक्त विद्यमाने योजना घेण्याचा निर्णय घेण्यात आला व प्रत्यक्ष विहीर श्रमदानातून विहीर खोदण्याचे कामदेखील सुरू झाले.- त्र्यंबक प्रधान, तोंडवळ