शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परधाडी शाळेला ‘कोणी शिक्षक देता का...शिक्षक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 15:17 IST

न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील परधाडी येथील इंदिरानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या दोन वर्षांपासून पहिली ते चौथी पर्यंतच्या वर्गाला एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पालकांनी ‘‘कोणी शिक्षक देता का...शिक्षक’ असा टाहो फोडला आहे.

पालकांचा टाहो : चार वर्गांचा भार एकट्यावर, विद्यार्थ्यांची परवड

न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील परधाडी येथील इंदिरानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या दोन वर्षांपासून पहिली ते चौथी पर्यंतच्या वर्गाला एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पालकांनी ‘‘कोणी शिक्षक देता का...शिक्षक’ असा टाहो फोडला आहे.  शाळा रंगकाम करून दिसायला सुंदर , डिजिटल , मुलांना शिकविण्यासाठी संगणक , एल.इ.डी. टी. व्ही. सर्व काही असतानाही मात्र शिक्षकाशिवाय या सर्व सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. गावातील सरपंच व शाळा व्यवस्थापक कमिटीच्या वारंवार मागणीला ही गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखवत असल्याने तालुक्यातील शिक्षण विभाग परधाडी गावातील इंदिरा नगर भागात असलेल्या या प्राथमिक शाळेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष का ? असा प्रश्न येथील पालकांनी उपस्थित केला आहे.पहिले ते चौथीचे सर्व विद्यार्थी एकत्र एकाच वर्गात बसवून शिकवत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. एकमेव असलेल्या शिक्षकावर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाारोबरच हाच शिक्षक प्रशासकीय माहितीची कामे , पोषण आहार , मूल्यमापन रेकॉर्ड , बिटस्तरीय व तालुकास्तरीय मिटिंगच्या दिवशी विद्यार्थीच बनतात शिक्षक अन शाळा चालवतात. एवढंच नव्हेतर शिक्षक व्यक्तिगत रजेवर गेला तर शाळेला पण सुट्टी देण्याची नामुष्की या शाळेवर गेल्या दोन वर्षांपासून येताना दिसत आहे.येथील ग्रामपंचायत सदस्य रामदास पवार , शाळा व्यवस्थापक अध्यक्ष वाल्मिक चव्हाण , शिवाजी जाधव यांनी अनेक वेळा पाठपुरावा करूनही या शाळेला शिक्षक मिळत नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या काळात अजून शिक्षक न मिळाल्यास सामुदायिक दाखले काढून घेऊन शाळेला कुलूप लावण्याचा इशारा शाळा व्यस्थापक अध्यक्ष वाल्मिक चव्हाण यांनी दिला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक