शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
2
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
3
टाटा कंपनीचा 'हा' स्टॉक झुनझुनवाला कुटुंबासाठी ठरला मल्टीबॅगर; एका दिवसात ४०० कोटींचा नफा
4
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
5
Rahul Gandhi : राहुल गांधी पोहोचले हरिओम वाल्मिकी यांच्या घरी, कुटुंबाने भेटायला दिला होता नकार; नेमकं प्रकरण काय?
6
गुरुद्वादशी २०२५: श्रीपाद श्रीवल्लभ यांचा स्मरण दिन; ३० वर्षांचे अद्भूत अवतार कार्य! वाचा
7
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
8
Diwali Muhurat Trading 2025 : शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
9
Nissan Magnite CNG : पेट्रोल दरवाढीला 'बाय बाय'! निसानची कार ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह लाँच; किंमत ऐकून खूश व्हाल
10
IRCTC Website Down: आयआरसीटीसीची तिकीट बुकिंग साईट झाली ठप्प! मोबाईल अ‍ॅपवरुनही बुकिंग होईना
11
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
12
Diwali 2025: अश्विन वद्य द्वादशीलाच वसुबारस का? कोणत्या गायीला हा सण समर्पित आहे माहितीय?
13
वयाच्या २५ व्या वर्षी ऑलिंपिक चॅम्पियननं घेतला संन्यास; एरियार्नच्या निर्णयानं चाहते हैराण
14
दिवाळीत शनि प्रदोष: शंकराची पूजा देईल पुण्य-लाभ, ‘असे’ करा व्रत; प्रभावी मंत्रांचे जप कराच
15
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
16
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
17
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
18
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
19
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
20
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?

रेशीमगाठी जुळविण्यात व्हॉट्स अ‍ॅपचे योगदान

By admin | Updated: April 24, 2017 02:06 IST

लग्न जुळविण्यासाठी पूर्वापार चालत आलेली साधने आता मागे पडत चालली असून, व्हॉट््स अ‍ॅप, फेसबुक आदि सोशल मीडियाची मदत घेतली जात आहे

 भाग्यश्री मुळे नाशिकलग्न जुळविण्यासाठी पूर्वापार चालत आलेली साधने आता मागे पडत चालली असून, व्हॉट््स अ‍ॅप, फेसबुक आदि सोशल मीडियाची मदत घेतली जात आहे. व्हॉट््स अ‍ॅप ग्रुपद्वारे लग्न जुळविण्याचा फंडा सध्या आघाडीवर असल्याचे दिसून येत असून, त्यामुळे लग्न जमविणे सोपे झाल्याचा सूर विवाहेच्छुकांकडून व्यक्त होत आहे.पूर्वी ओळखीच्या नातेवाइकांकडे शब्द टाकला की इच्छुक वधू-वरांची स्थळे समजायची. पत्रिका जुळली की पाहण्याचा कार्यक्रम, पसंती झाली की बैठक आणि साखरपुडा, लग्नाची निश्चिती या गोष्टी लगोलग होत असत. आता मात्र वधू-वर आणि त्यांच्या पालकांच्या वाढत्या अपेक्षा आणि बदललेली सामाजिक परिस्थिती बघता लग्न जमविणे हे अवघड काम होऊन बसले आहे. त्यामुळे प्रत्येक समाजाच्या वतीने मुखपत्राच्या मदतीने प्रसिद्ध होणारी स्थळांची माहिती, त्यानंतर स्थळांसंबंधीचा होणारा पत्रव्यवहार, इमेलचा वापर वाढल्यानंतर मेलने होऊ लागला. त्यानंतर सकेतस्थळांची चलती वाढली. संकेतस्थळांवर स्थळांसंबंधी फोटोसह सविस्तर माहिती असल्याने लोकांना ते उपयुक्त वाटू लागले. मेल मागे पडले आणि त्याची जागा फेसबुक, व्हॉट््स अ‍ॅपने घेतली आहे. सध्या लग्न जुळविण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित व्हॉट््स अ‍ॅप ग्रुप कार्यरत आहेत. त्यात प्रत्येक जातीनुसार वेगवेगळे व्हॉट््स अ‍ॅप ग्रुप चालविले जात आहे. याशिवाय हुंडा घेणारे, न घेणारे, आंतरजातीय, आंतर धर्मीय लग्न करण्यास तयार असणाऱ्यांचे व्हॉट््स अ‍ॅप ग्रुप रेशीमगाठी जुळविण्यात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. हे व्हॉट््स अ‍ॅप ग्रुप मोफत सभासदत्व व माहिती देत आहेत. इच्छुक वधू-वरांचे फोटो, बायोडाटा, कौटुंबिक माहिती, छंद -आवडीनिवडी, अपेक्षा या साऱ्यांची माहिती संक्षिप्त आणि थेटपणे मिळत असल्याने वधू-वर व त्यांच्या पालकांना निर्णय घेणे सोपे जात आहे.४ग्रुपमध्ये सहभागी होणाऱ्यांना सुरुवातीला नियमावली सूचना स्वरूपात दिली जात असून, घ्यावयाची काळजी याबाबतही मार्गदर्शन केले जात आहे. सध्या देशभर जातीनुसार, समाजानुसार, वयानुसार, ३५ प्लस, ४० प्लस, एमपीयूपी (मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश), महाराष्ट्र प्लस एमपीयूपी असे असंख्य ग्रुप कार्यरत आहेत. ‘शुभविवाह’, ‘शुभबंधन’, ‘रेशीमगाठी’, ‘खान्देशविवाह’ अशा विविध नावांनी हे ग्रुप कार्यरत आहेत. ग्रुपवर दररोज स्थळांचे विविध पर्याय, सविस्तर माहिती, फोटो, अपेक्षा या साऱ्या गोष्टी येत असतात, पण त्याचबरोबर ग्रुपच्या माध्यमातून लग्न जुळल्यास त्याची बातमी, साखरपुड्याचा फोटो अशा गोष्टीही शेअर केल्या जात आहे.