शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकलहऱ्यात बिबट्याचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 02:01 IST

एकलहरे-हिंगणवेढा वाळूवाट शिवारातील मळ्यात बिबट्याने हल्ला चढवून शेतकºयाच्या ८ ते ९ कोंबड्या फस्त केल्याने परिसरातील शेतकºयांमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देकोंबड्यांचा पाडला फडशा : पिंजरा काढून नेल्याने बिबट्या मोकळा

एकलहरे : येथील एकलहरे-हिंगणवेढा वाळूवाट शिवारातील मळ्यात बिबट्याने हल्ला चढवून शेतकºयाच्या ८ ते ९ कोंबड्या फस्त केल्याने परिसरातील शेतकºयांमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे.एकलहरे-हिंगणवेढा परिसरात बिबट्याचा वावर असल्याने व त्याने अनेक कुत्रे, बकरे फस्त केल्याने या भागात बिबट्याला बंदिस्त करण्यासाठी पिंजराही लावण्यात आला होता. मात्र महिनाभराचा कालावधी उलटूनही बिबट्या पिंजºयात बंदिस्त न होता वनविभागाला हुलकावणी देत आहे. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाºयांनी या भागात लावलेला पिंजरा अखेर तेथून हलविला. बिबट्याने पिंजºयाकडे पाठ फिरविली असली तरी, तो परिसरातील नागरिकांना दिवसा दर्शन देत असल्याची नागरिकांच्या तक्रारी आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड असल्याने बिबट्या तेथे लपत असावा असा अंदाज होता, परंतु आता परिसरातील बहुतेक भागात ऊसतोड झाल्याने बिबट्या एकलहरेकडे स्थलांतरित झाला असावा, असा अंदाज आहे.रविवारी रात्री २ वाजेच्या सुमारास एकलहरे शिवारातील वाळूवाट रस्त्यावरील योगेश नावाडकर यांच्या शेतातील घराबाहेर कोंबड्यांंच्या जाळीवर बिबट्याने हल्ला चढवून ८ ते ९ कोंबड्यांचा फडशा पाडला. कोंबड्यांच्या कलकलाटाने योगेश व त्याचे भाऊ राजाराम यांनी बाहेर येऊन पाहिले असता बिबट्याने घातलेला धुमाकूळ पाहून घरातून बॅटरी व काठ्य घेऊन बाहेर आले. एकाने गाडी चालू करून उजेड व हॉर्नचा कर्कश आवाज केला व बिबट्याला पळवून लावले.मंगळवारी सकाळी गावातील संदीप पवळे व नावाडकर यांनी वन अधिकारी रवि भोगे यांच्याशी संपर्क साधून रात्रीच्या घटनेबाबत माहिती दिली. वन विभागाच्या कर्मचाºयांनी येऊन शेताची व बिबट्याच्या ठशांची पाहणी केली. या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शांताराम राजोळे, अशोक पवळे, ज्ञानेश्वर पवळे, बबन राजोळे, राजाराम भवर, राजू जाधव आदी शेतकºयांनी केली आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या