वावी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने येथील शिवाजी चौकात चाबूक आंदोलन करण्यात आले.सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा-पाणी व्यवस्था करण्यात यावी, दुष्काळी सवलतींचा लाभ देण्यात यावा, कर्जवसुली त्वरित थांबवून संपूर्ण कर्ज माफ करावे यासाठी महाराष्टÑ क्रांतिसेनेने शासनाला वेळावेळी निवेदने दिली आहेत; मात्र त्याचा उपयोग न झाल्याने महाराष्टÑ क्रांती सेनेच्या वतीने पूर्व भागातील वावी येथे चाबूक आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.सिन्नर तालुक्यावर वारंवार दुष्काळ पडत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळ नावाचे भूत मानगुटीवर बसले आहे. दुष्काळाचे भूत हटवावे यासाठी दुष्काळी भुताला चापकाचे फटके मारा आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांच्यासह उपजिल्हाध्यक्ष अमोल जाधव, तालुकाध्यक्ष गोपाळ गायकर, ज्ञानेश्वर पांगारकर, सुनील काटे, अक्षय जाधव, चंद्रकांत डावरे, सोपान जाधव, गणेश जाधव, सतीश आरोटे, योगेश गुरुळे, भाऊसाहेब सहाणे, बाळासाहेब सहाणे, कैलास दातीर, अर्जुन घोरपडे, अंकुश आव्हाड, शुभम मुरकुटे, जगन्नाथ गरकळ, तुषार काळे, नागेश कोथमिरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. चारा छावण्यासाठी निवेदने, ठिय्या आंदोलन, उपोषण करण्यात आले. चारा-पाणी मिळत नसल्याने बळीराजा हैराण झाला आहे. बळीराजाने जनावरांना बाजाराची वाट दाखविण्यास प्रारंभ केला आहे. शेतकरी आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांना मुलांच्या शाळेची फी भरायला पैसे नाही. शासन शेतकºयांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे क्रांतिसेनेचे जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांनी यावेळी सांगितले.
वावी येथे चारा छावणीसाठी चाबूक मारा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:43 IST
वावी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने येथील शिवाजी चौकात चाबूक आंदोलन करण्यात आले.
वावी येथे चारा छावणीसाठी चाबूक मारा आंदोलन
ठळक मुद्दे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न