शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

स्वच्छ सर्वेक्षण सुरू असताना नाशिकच्या महापौरांना मात्र शहरात अस्वच्छतेचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 19:06 IST

स्वच्छ सर्वेक्षण : महापौरांसह पदाधिका-यांकडून ठिकठिकाणी पाहणी दौरा

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षणाच्या परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा प्रशासनाचा दावा फोल स्वच्छ सर्वेक्षणात मागील वर्षी नाशिक १५१ व्या क्रमांकावर फेकले गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: नाशिक महापालिकेचे कान उपटले होते

नाशिक - केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाला एकीकडे ४ जानेवारीपासून सुरूवात झालेली असताना महापौरांसह पदाधिका-यांना पाहणी दौ-यात ठिकठिकाणी अस्वच्छतेसह अव्यवस्थेचे दर्शन घडत आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणाच्या परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा प्रशासनाचा दावा फोल ठरत असून गेल्या चार-सहा महिन्यांपासून होत असलेल्या तयारीवरच प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात मागील वर्षी नाशिक १५१ व्या क्रमांकावर फेकले गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: नाशिक महापालिकेचे कान उपटले होते. यावर्षी नाशिकची कामगिरी उंचावण्याचेही त्यांनी आदेशित केलेले आहे. त्यानुसार, महापालिका प्रशासनाकडून विविध गुणांकनासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनाही केल्या जात असल्याचा दावा केला जात आहे. स्वच्छ सर्वेक्षणाला प्रत्यक्ष गुरुवार (दि.४) पासून सुरुवात झाली असून केंद्रीय समितीचे पथक शहरातील स्वच्छतेच्या कामकाजाची कधीही-केव्हाही पाहणी करण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासन पथकाच्या प्रतीक्षेत असतानाच गेल्या तीन-चार दिवसांपासून महापौरांसह पदाधिकाºयांनी शहरात ठिकठिकाणी पाहणी दौरे सुरू केले आहेत. मात्र, या दौºयात महापौरांसह पदाधिका-यांना प्रशासनाच्या कामकाजाचा फोलपणा निदर्शनास येत आहे. ठिकठिकाणी अस्वच्छतेसह अव्यवस्थेचे दर्शन घडत आहे. शुक्रवारी (दि.५) महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेते दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, आरोग्य समिती सभापती सतीश कुलकर्णी, शहर अभियंता उत्तम पवार, आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांचेसह नगरसेवक गजानन शेलार, हिमगौरी अहेर, स्वाती भामरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी उद्यान, डॉ. आंबेडकर उद्यान, मेळा बस स्थानक, सेंट्रल बस स्थानक, महात्मा गांधी रोड, शिवाजीरोड, शरणपूर रोड, फुले मार्केट, फाळके रोड येथे पाहणी केली. परिसरातील आरोग्य विषयक समस्या,रस्ते, वीज,गटार,बांधकाम आदी विषयाच्या समस्या जाणून घेऊन संबधित विभागाचे अधिका-यांना कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे आदेशित केले. ब-याच ठिकाणी कचरा उचललेला नसल्याचे आढळून आले. शिवाजी उद्यानातील भयावहकता पाहून सारेच हैराण झाले. काही ठिकाणी उघड्या गटारी कच-याने तुंबलेल्या दिसून आल्या. या अव्यवस्थेमुळे पदाधिका-यांनी संताप व्यक्त करत त्या-त्या खातेप्रमुखांना जाब विचारत धारेवर धरले.आताच कसे सुचले?स्वच्छ सर्वेक्षणाचा पेपर सुरू झाला असताना महापौरांसह पदाधिका-यांच्या पाहणी दौºयात स्वच्छतेच्या कामाचे वाभाडे निघत आहेत. स्वच्छ सर्वेक्षणासाठीची तयारी गेल्या चार-सहा महिन्यांपासून सुरू असताना त्याचवेळी महापौरांसह पदाधिका-यांनी स्वच्छतेच्या कामांबाबत असलेला कळवळा दाखविला असता तर कदाचित आजच्या घडीला अव्यवस्थेचे दर्शन घडले नसते. आता वधूसंशोधनासाठी वराकडील मंडळी येऊ घातली असताना आपल्याच मुलीविषयीचे दोष त्यांच्यासमोर उघडे करून मुलीला नाकारण्यास भाग पाडण्याचा हा प्रकार चर्चेचा आणि मनोरंजनपर ठरत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान