सुरगाणा : दोन हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या तलाठीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.सुरगाणा तालुक्यातील माणी सजेत कार्यरत असलेले वर्ग तीनचे तलाठी शंकर संभाजी मायकलवाड (५५) रा. म्हसरुळ, नाशिक यांनी तालुक्यातील बाफळून येथील २५ वर्षीय युवकाकडे त्याच्या आजोबांचे नावे असलेल्या शेतीला वडिलांचे नाव लावण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितली होती.यासंदर्भात सदर युवकाने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, पोलिस उप अधिक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक युनिटचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिकारी प्रभाकर निकम, पोलिस निरिक्षक संदीप साळुंके, पोलिस नाईक वैभव देशमुख, प्रभाकर गवळी, नितीन कराड, चालक पो.हवा. विनोद पवार आदींच्या पथकाने आलेल्या तक्रारीवरून बुधवारी ( दि.२८) सुरगाणा येथे लावलेल्या सापळ्यात पंचासमक्ष तलाठी शंकर मायकलवाड यांनी दोन हजार रुपयांची लाच स्विकारल्यावर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तलाठी मायकलवाड यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई उशिरापर्यंत सुरू होती.
दोन हजाराची लाच स्विकारताना तलाठी रंगेहात ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 18:58 IST
सुरगाणा : दोन हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या तलाठीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.
दोन हजाराची लाच स्विकारताना तलाठी रंगेहात ताब्यात
ठळक मुद्देसुरगाणा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई