शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

पिंपळगावचे अग्निशमनदल कधी होणार ‘फायरप्रूफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:24 IST

गणेश शेवरे । पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव अग्निशमन दल हे नाशिक जिल्ह्यातील सर्वांत जुन्या अग्निशमन दलापैकी एक असून येथेसुविधांची ...

ठळक मुद्देअत्याधुनिक वाहनांची गरज : निफाडसह दिंडोरी, चांदवड या तालुक्यांचा वाढता विस्तार

गणेश शेवरे ।पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव अग्निशमन दल हे नाशिक जिल्ह्यातील सर्वांत जुन्या अग्निशमन दलापैकी एक असून येथेसुविधांची वाणवा आहे.सेवेस तत्पर असलेल्या या केंद्राची स्थापना १९९२ मध्ये झाली या कालावधीत आतापर्यंत अंदाजे पाच हजारांहून अधिक छोट्या मोठ्या प्रसंगाला येथील अग्निशामक दल सामोरे गेले आहे, पण येथील वाहनास आज २७हून अधिक वर्ष उलटूनही एवढ्या वर्षांनंतरही पिंपळगाव बसवंत अग्निशामक दलाचे वाहन निफाड, दिंडोरी आणि चांदवड तालुक्यातील गावांच्या सुरक्षिततेसाठी वरदान ठरत आहे.पिंपळगावासह निफाड, दिंडोरी व चांदवड या तिन्ही तालुक्यांत अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अलीकडेच गोरठाण परिसरात अपघाती सुकोई विमान पडल्याने लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी या केंद्राला सुविधांअभावी कसरत करावी लागली. गॅस सिलिंडरच्या दुर्घटना, शॉटसर्किटमुळे लागलेली आग या सकंटांना सामोरे जाण्यासाठी २७ वर्षीय जुन्या वाहनाला घेऊन येथील जवान प्रसंग आटोक्यात आणण्यासाठी कसरत करतात. यामुळे एक नवीन तंत्रज्ञानाने विकसित केलेले वाहन असणे गरजेचे आहे. आता हे केंद्र ‘फायरप्रूफ’ करण्याची गरज निर्माण झाली आहे.विविध गावांमधील नैसर्गिक आपत्तीमध्ये येथील अग्निशमन दलाने मोलाची कामगिरी बजावली आहे. महापूर अशा तसेच अन्य नैसर्गिक आपत्तीपासून ते पाण्यात पडलेल्या डेड बॉडी शोधण्यासह गणपती विसर्जन अतिमहत्त्वाचे योगदान देणाº्या दलाच्या जवानांच्या व्यथांना तसेच अडचणींची सोडवणूक मात्र म्हणावी तशी होत नाही. थेट आगीशी सामना करताना श्वानापासून ते स्वत:चा बचाव करत आगीत अडकलेल्यांची सुखरूप सुटका करण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण तसेच साधनसामग्री मिळणे या जवानांना आवश्यक आहे.आपत्तीच्या वेळी जलदगतीने प्रतिसाद देणे तसेच आपत्तीच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी अत्याधुनिक कार्यप्रणाली असलेले वाहनाची गरज आहे. इंटिग्रेटेड कमांड व कंट्रोल सिस्टिम, जीआयएस व जीपीएसवर आधारित स्वयंचलित वाह न ट्रॅकिंग प्रणाली आणि डिस्ट्रेस कॉल रिस्पॉन्स व्यवस्थापन यंत्रणा असावी. डायल १०१ ही प्रणाली असलेले गावांचा व्याप वाढला आहे.अग्निशामकची सुविधा पुरविली जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीकडे बदलते तंत्रज्ञान, वाढत्या औद्योगिकीकरणासह आणखी एक अत्याधुनिक वाहन असणे गरजचे आहे. ग्रामपालिका, बाजार समिती व एम.आय.डी.सी यांनी आपले हेवेदावे बाजूला ठेवून गावाच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नवीन तंत्रज्ञानाचे वाहन घेणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहे.निफाड तालुक्यासह दिंडोरी, चांदवड या तिन्ही तालुक्यांचा विस्तार वाढला आहे. केमिकल झोन तसेच वाढते पेट्रोल पंप व कारखानदारी वाढली आहे. या सर्वांची सुरक्षितता केवळ पिंपळगाव बसवंतच्या अग्निशमक दलावर आहे. त्यामुळे अजून एक नवीन अत्याधुनिक कार्यप्रणाली असलेले वाहन व त्यात इंटिग्रेटेड कमांड व कंट्रोल सिस्टिम, जीआयएस व जीपीएसवर आधारित स्वयंचलित वाहन ट्रॅकिंगप्रणाली आणि डिस्ट्रेस कॉल रिस्पॉन्स व्यवस्थापन यंत्रणा-डायल १०१ ही प्रणाली असलेले वाहन असणे गरजेचे आहे.- सुनील मोरे, अग्निशमक प्रमुख, पिंपळगाव बसवंत

टॅग्स :fireआग