कळवण तालुक्यात नवीन कोविड सेंटर उघडणार कधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 03:36 PM2020-10-12T15:36:48+5:302020-10-12T15:37:47+5:30

पाळे खुर्द : मानूर कोविड सेंटर आॅक्सिजन बेड उभारणी कधी कीफक्त राजकारणच का? असाआरोपछावा संघटनेनेकेलाआहे. कळवण तालुक्यातील मानूर कोविड सेंटरमध्ये आॅक्सिजन बेड उभारणी करण्यासाठी राजकारण्यांनी गाजावाजा केला, मात्र अद्यापपर्यत आॅक्सिजन बेड उभारणी झालेली नाही. प्रशासनाकडून आॅक्सिजन बेडच्या कामात दिरंगाई होत आहे. येत्या आठ दिवसाच्या आत मानूर येथील आॅक्सिजन बेड कोविड सेंटर सुरु न झाल्यास रस्त्यावरउतरण्याचे छावा क्र ांतिवीर सेनेच्या वतीने सहाय्यक उपजिल्हा अधिकारी विकास मीना यांना निवेदनाव्दारे केला आहे.

When will the new Kovid Center be opened in Kalvan taluka? | कळवण तालुक्यात नवीन कोविड सेंटर उघडणार कधी

कळवण तालुक्यात नवीन कोविड सेंटर उघडणार कधी

Next
ठळक मुद्देआदिवासी नागरिकांमध्ये उत्सुकता ;छावा संघटेनेचे अधिकाऱ्यांना निवेदन

पाळे खुर्द : मानूर कोविड सेंटर आॅक्सिजन बेड उभारणी कधी कीफक्त राजकारणच का? असाआरोपछावा संघटनेनेकेलाआहे. कळवण तालुक्यातील मानूर कोविड सेंटरमध्ये आॅक्सिजन बेड उभारणी करण्यासाठी राजकारण्यांनी गाजावाजा केला, मात्र अद्यापपर्यत आॅक्सिजन बेड उभारणी झालेली नाही. प्रशासनाकडून आॅक्सिजन बेडच्या कामात दिरंगाई होत आहे. येत्या आठ दिवसाच्या आत मानूर येथील आॅक्सिजन बेड कोविड सेंटर सुरु न झाल्यास रस्त्यावरउतरण्याचे छावा क्र ांतिवीर सेनेच्या वतीने सहाय्यक उपजिल्हा अधिकारी विकास मीना यांना निवेदनाव्दारे केला आहे.
गेल्या पंधरा दिवपासपुर्वी जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाच्या संयुक्त बैठक घेऊन जागेची पाहणी करून ५० आॅक्सिजन बेड व त्यास लागणारी यंत्रणा, औषधे यांची लवकरच उपायोजना केली जाईल असे तालुक्यातील जनतेला दिलासा मिळाला होता. मात्र इतके दिवस उलटून उपाय केल्या नसल्याने जनतेनी नाराजी व्यक्त केली आहे. कोविड सेंटरसाठी डॉक्टर, आरोग्यसेविका, शिपाई, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक यांची संख्या वाढविण्यात यावी तसेच वाढलेल्या रु ग्णांसाठी लागणारी औषधे, रु ग्णाचे स्वॉब घेण्यासाठी लागणारे पुरेसे किट कर्मचाºयासाठी पी पी इ किट एन ए मास याची तात्काळ पूर्तता करण्यात यावी, जम्बो आॅक्सिजन सिलेंडर हे अजून हि बसविण्यात आलेले नाही. अभोणा, कळवण येथून रु ग्णांना नाशिक रु ग्णालयात नेण्यासाठी रु ग्णवाहिका कमी पडत आहे. रु ग्णवाहिकेमध्ये आॅक्सिजन सिलेंडरची वाहतूक होती त्या वाहतुकीसाठी दुसरी वाहन उपल्बध करून रु ग्णवाहिका हि रु ग्णासाठीच ठेवावी अतिगंभीर रु ग्णांना नाशिक कोविड सेंटर येथे पाठविण्यात येते मात्र नाशिकहून असे सांगितले जाते कि येथे बेड शिल्लक नसल्याने रु ग्ण पाठवत नका जाऊ त्यासाठी नाशिक जिल्हातील ग्रामीण भागातील रु ग्णांकरिता नाशिक येथे सर्व सुविधायुक्त एक हजार नवीन कोविड सेंटर उभारावे अश्या विविध मागण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांना निवेदन देण्यात आले.

मानूर कोविड सेंटर येथे आॅक्सिजन बेड उभारणी वरिष्ठ पातळीवरून आदेश नसल्याने काम सुरु केले नाही. त्यासाठी लागणारे कर्मचारी हि उपल्बध नाही रु ग्णवाहिका नाही, औषधे नाही. किट अशा विविध सुविधा उपल्बध झाल्या नसल्याने काम सुरु केले नाही.
- सुधीर पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी.

Web Title: When will the new Kovid Center be opened in Kalvan taluka?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.