शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचे आडगाव स्मार्ट कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 11:24 IST

नागरिकांच्या भावना : समस्या त्याच खेड्याचे प्रश्न सुटेना

ठळक मुद्देनागरिकांच्या भावना : समस्या त्याच खेड्याचे प्रश्न सुटेना

नाशिक : नाशिक महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर २३ खेड्यांच्या पालिका हद्दीत समावेश करण्यात आला. पालिका हद्दीत समावेश होऊन गावाचा विकास होईल अशी येथील रहिवाश्यांची अपेक्षा होती पण अजूनही आडगाव ‘पारंपरिक गाव’ किंबहूना खेडेच राहिले आहे. या गावातील जुन्या वस्त्या, जुनी घरे, गावाची शिव अजूनही जशीच्या तशीच आहे. शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असताना आडगाव स्मार्ट कधी होणार? असा प्रश्न गावातील नागरिकांना पडला आहे.आडगाव परिसराची नवीन ओळख नाशिक शहरात शिक्षणाचे माहेरघर म्हणून तयार झाली आहे. नाशिक महानगरपालिका विकास आराखड्यात आडगावचा आजूबाजूचा परिसर रहिवासी झोनमध्ये असल्यामुळे जत्रा हॉटेल परिसर, कोणार्कनगर, सागर व्हिलेज, श्रीरामनगर, शरयू पार्क अशा नवीन वसाहती उभ्या राहिल्याने या परिसराचा झपाट्याने विकास झाला. त्यामुळे नवीन व्यवसाय या परिसरात तयार झाले. अनेक नवीन कॉलनी, वसाहती तयार झाल्या, पण तरी आजही आडगावचा पाहिजे तसा विकास दिसून येत नाही. अजूनही भारनियमन सुरू झाल्यांनतर १४ तास अंधारात काढावे लागतात त्यामुळे आम्ही नक्की महानगरपालिका क्षेत्रांत राहतो काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे.आज गावात प्रत्येकाच्या घरात चारचाकी आहे, पण त्या चारचाकी गाड्या गावात फिरू शकतील असे मोठे रु ंद रस्ते गावकऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. अजूनही मळे परिसरात कच्चे रस्ते आहे, तर काही ठिकाणी खड्डे पडलेले आहे, तर गावातील मुख्य रस्ता म्हणजेच जुना मुंबई-आग्रा महामार्ग अरु ंद आहे. शिवाय अजूनही महानगरपालिका प्रशासनाकडे हस्तांतरित नसल्याने या रस्त्याचे रु ंदीकरण रखडले आहे. या रस्त्याचे रु ंदीकरण होणे गरजेचे आहे. यासोबत अजूनही गावात आले की जुने दुकाने, टपºया बघायला मिळते. गावात पार्किंगसाठी सुसज्ज जागा नाही. सकाळी गावात येणारे सर्व लोक रस्त्यावरच आपली दुचाकी वाहने उभी करतात त्यामुळे इतर वाहनांना जाताना येताना मोठा अडथळा निर्माण होतो व छोटे-मोठे अपघात होण्याची भीतीदेखील बळावते.

टॅग्स :Nashikनाशिक