शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सर्पाने फुस्कारल्यावर तरूणाचा ‘दस नंबरी’ लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 13:19 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील सर्पदंश झालेल्या तरूणाला दहा दिवसांनंतर वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

ठळक मुद्देनांदूरवैद्य : डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर वाचविण्यात यश

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील सर्पदंश झालेल्या तरूणाला दहा दिवसांनंतर वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. इगतपुरी धामणगाव येथील गणेश नंदू बरतड या २५ वर्षीय तरु णाला शनिवारी (दि.१६) रोजी शेतात काम करत असतांना भात कापणी यंत्र चालवतांना अतिविषारी सर्प दंश झाला होता. ही माहिती सरपंच शिवाजी गाढवे यांना कळताच सरपंच त्यांनी तात्काळ आपले सहकारी ज्ञानेश्वर कोंडूळे, राजू गाढवे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली व गणेशला तात्काळ एस.एम.बी.टी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अतिविषारी सर्प दंश झाल्याने गणेशच्या शरीररातील रक्तवाहिन्यांमध्ये गाठ तयार होऊन रक्तवाहिन्या बंद पडल्या होत्या. त्यामुळे त्याचे शरीर पूर्ण काळे पडले होते. रक्तवाहिन्या बंद झाल्याने व शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेऊन बाहेरून आॅक्सिजन देण्यात आला.बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी दाखल केलेल्या तरु णावर लवकर उपचार करण्यात यावे यासाठी एस.एम.बी.टी रु ग्णालयाचे मुख्याधिकारी डॉ.हर्षल तांबे, मुख्य व्यवस्थापक कुर्हे, वरपे, डॉ.प्रदीप नाईक, डॉ.बागडे यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर मुख्याधिकारी डॉ.हर्षल तांबे यांच्या प्रयत्नामुळे व सर्वांच्याच धावपळीमुळे डॉ.माने यांच्या मार्फत उपचार करण्यात आले. गणेश हा रु ग्णालयात तब्बल दहा दिवस व्हेंटिलेटरवरती मृत्यशी झुंज देत होता. तात्काळ सुविधा देऊन योग्य उपचार झाल्याने तब्बल दहा दिवसानंतर डॉक्टरांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. आपल्या मुलाच्या जीव वाचला ही माहिती सर्प दंश रु ग्ण गणेश बरतड याच्या आई वडील नातेवाईकांना समजताच सर्वांनी मोकळा श्वास सोडला व सर्वांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.-----------------तब्बल दहा दिवस व्हेंटिलेटरवरती ठेऊन बाहेरून प्राणवायू देऊन गणेशवर उपचार चालू होते.अखेर दहा दिवसाच्या संघर्षानंतर गणेश शुद्धीवर आला.त्याचा जीव वाचला यामध्ये आमचे ज्युनिअर डॉ, नर्स, स्टाफ यांचे अथक प्रयत्न होते याचे मला समाधान वाटते.- डॉ.अनिल माने, एस.एम.बी.टी रु ग्णालय--------------आज पुन्हा एकदा डॉ.माने व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर मृत्यच्या दारात असलेल्या गणेशचा प्राण वाचला.त्याचे समाधान वाटत आहे.- शिवाजी गाढवे, सरपंच धामणगाव

टॅग्स :Nashikनाशिक