शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

...जेव्हा नाशिकच्या रुग्णाचा मृतदेह भोपाळच्या दिशेने रवाना होतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 17:53 IST

जिल्हा शासकीय रुग्णालय : नातेवाईकांनी ओळख पटवून ताबा घेतला 

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षातून उत्तरीय तपासणी होऊन संबंधित नातेवाईकांद्वारे ओळख पटवून प्रशासनाकडून दोन्ही मृतदेह त्यांच्या कुटूंबियांना सोपविण्यात आले खरे; मात्र नाशिकचा मृतदेह थेट भोपाळच्या दिशेने आणि भोपाळवासीय मृत व्यक्तीचा मृतदेह नाशिककर कुटुंबीयांकडे आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांची चूक असल्याचे सांगितले आहे.

गेल्या शनिवारी संध्याकाळच्या सुमारास दोन मृतदेहांचा शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर त्यांचे कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले मात्र यावेळी दोन्ही कुटुंबीयांची गफलत झाल्याने मृतदेह ताब्यात घेताना व रुग्णवाहिकेत ठेवतांना आदलाबदल झाल्यामुळे नाशिककर मयत व्यक्तीचा मृतदेह भोपळ्यात रुग्णवाहिकेत आणि भोपाळस्थित मयत व्यक्तीचा मृतदेह नाशिकच्या कुटुंबीयांकडे आला. दरम्यान, हा सगळा प्रकार नाशिककर कुटुंबीयांकडून मृतदेहाच्या अंत्यसंस्कारला घेऊन जात असताना निदर्शनास आला. त्यामुळे तात्काळ नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली.

 टोल नाक्यावर मृतदेहांचा मध्यरात्री ताबा

नाशिककर कुटुंबातील सदस्यांनी भोपाळच्या दिशेने निघालेल्या रुग्णवाहिकेच्या नातेवाईकांचा संपर्क क्रमांक मिळवून तात्काळ त्यांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. यामुळे त्वरित चांदवड जवळील टोल नाक्यावर भोपालकडे जाणारी रुग्णवाहिका थांबविण्यात आली. त्यानंतर नाशिक कुटुंबीयांनी त्यांच्याजवळ असलेला भोपाळस्थित व्यक्तीचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिकेने चांदवड घातले आणि मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास या दोन्ही कुटुंबांनी एकमेकांच्या मयत नातेवाईकांची पुन्हा खात्रीपूर्वक ओळख पटवून मृतदेह ताब्यात घेतले.मृतदेह आदलाबदलचा सगळा प्रकार नेमका जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाला की नातेवाईकांचे चुकीमुळे याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

मृतदेह आदलाबदलचा हा सगळा प्रकार नातेवाईकांच्या चुकीमुळे घडल्याचे स्पष्ट आहे. कारण दोन्ही कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेताना  नातेवाईकांनी ओळख पटविली होती त्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून काही हलगर्जीपणा झालेला नाही. संबंधित नातेवाईकांची नोंद स्वाक्षरीसह रुग्णालयाच्या दप्तरी आहे.

मृतदेह चुकीच्या पद्धतीने वेगवेगळ्या रुग्णवाहिकामध्ये ठेवण्यात आल्याने हा सगळा गोंधळ झाला. रुग्णवाहिकेतून मृतदेह ठेवण्यापर्यंतची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची नाही.-  डॉ.निखिल सैंदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक-

टॅग्स :hospitalहॉस्पिटल