शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सिडको भागात रात्रीपर्यंत बॅँकेचा दरवाजा उघडा राहतो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 00:26 IST

मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर दरोडेखोरांकडून सशस्त्र हल्ला चढविल्याची घटना ताजी असतानाच सिडको परिसरातील कामटवाडे येथील ठाणे जनता सहकारी बॅँकेचा पाठीमागील दरवाजा रात्री साडेआठ वाजेपर्यंत सताड उघडाच होता. बॅँकेच्या एटीएमजवळ रात्री काही तरी हालचाल झाल्याने उघड्या दरवाजाजवळील सायरन वाजले.

नाशिक : मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर दरोडेखोरांकडून सशस्त्र हल्ला चढविल्याची घटना ताजी असतानाच सिडको परिसरातील कामटवाडे येथील ठाणे जनता सहकारी बॅँकेचा पाठीमागील दरवाजा रात्री साडेआठ वाजेपर्यंत सताड उघडाच होता. बॅँकेच्या एटीएमजवळ रात्री काही तरी हालचाल झाल्याने उघड्या दरवाजाजवळील सायरन वाजले. परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत पोलिसांना माहिती दिली. अवघ्या काही वेळेतच घटनास्थळी पोलिसांची कुमक सशस्त्र दाखल झाली. तत्काळ बॅँकेच्या परिसरात घेराबंदी करण्यात आली.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी फायनान्स कंपन्यांसह बॅँक अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक बोलावून त्यांच्याशी सुरक्षेविषयी चर्चा करत खबरदारीच्या उपाययोजना सुचविल्या. सुरक्षेमध्ये कसूर राहणार नाही, याबाबत दक्ष राहण्यास नांगरे-पाटील यांनी सांगितले; मात्र बैठकीला आठवडा उलटत नाही तोच एका बॅँकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाºयांचा निष्काळजीपणाचा कळस समोर आला. सुदैवाने चोरट्यांची नजर बॅँकेच्या उघड्या दरवाजावर पडली नाही, अन्यथा लाखो रुपयांची लुटीचा धोका होता, असे पोलिसांनी सांगितले. ठाणे जनता बॅँकेच्या कामटवाडे शाखेचा पाठीमागील बाजूस असलेला लाकडी दरवाजा व त्याभोवती असलेली लोखंडी ग्रील रात्री साडेआठ वाजेपर्यंत उघडी होती. सुदैवाने सायरन वाजला आणि नागरिकांचे लक्ष वेधले गेले. उपआयुक्त अमोल तांबे यांनी बॅँकेच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेºयांचे फुटेज तपासले असता दुपारी २ वाजून १७ मिनिटांपासून दरवाजा रात्रीच्या ८.३० वाजेपर्यंत उघडाच असल्याचे आढळले.‘अ‍ॅलर्ट कॉल’होताच पोलीस सज्जया घटनेने शहर पोलिसांना चांगलेच हादरवले. उपआयुक्त अमोल तांबे यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देत सतर्क केले. त्यानंतर नियंत्रण कक्षावरून सतर्क ‘कॉल’ होताच शहर पोलीस सज्ज झाले. उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी तत्काळ शहर व परिसरात नाकाबंदीसह गस्त पथकांना सूचना दिल्या. शहराच्या सीमा नाक्यांनाही सतर्क करण्यात आले. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी हे घटनास्थळी पोहचले. आयुक्तालयातूनही सशस्त्र जवान दाखल होत ‘पोझिशन’ घेतली. परोपकारी यांनी बॅँकेच्या शाखा व्यवस्थापकाला याबाबत माहिती दिली. व्यवस्थापक आल्यानंतर परोपकारी त्यांच्यासोबत आतमध्ये गेले असता बॅँकेत दरोडेखोर, चोरटे नसल्याची खात्री पटली.

टॅग्स :bankबँकPoliceपोलिस