शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यात गहू उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 11:39 IST

पाटोदा  :- येवला तालुक्यातील शेतकरी सध्या गहू काढणीच्या कामात व्यस्त झाला असून कामाला वेग आला आहे. या वर्षी पिकावर मावा व करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे.

पाटोदा  :- येवला तालुक्यातील शेतकरी सध्या गहू काढणीच्या कामात व्यस्त झाला असून कामाला वेग आला आहे. या वर्षी पिकावर मावा व करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. एकरी पाच ते सहा क्विंटलपर्यतच उत्पन्न निघत असल्याने गहू उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. हरभरा व ज्वारीच्या पिकाचीही हिच अवस्था झाली असल्याने आता शेतात कोणते पीक घ्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावू लागला आहे. गहू काढणीसाठी शेतकरी मोठया प्रमाणात हार्वेस्टरचा वापर करतांना दिसत आहे.नवीन तंत्रज्ञानामुळे शेतकरी वर्गाचे हित लक्षात घेऊन सध्या हार्वेस्टरमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आला असून या नवीन हार्वेस्टरमध्ये गव्हाचा भुसा देखील साठवला जात असल्याने जनावरांच्या वैरणीचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होत असल्याने शेतकरी हार्वेस्टरला पसंती देत आहे. गेल्या पाच सहा वर्षांपासून येवला तालुक्यातील शेतकरी दुष्काळाशी सामना करीत शेती करीत आहे.दिवाळीनंतर तालुक्यातील निम्यापेक्षा जास्त गावांना पाणी टंचाई निर्माण होत असल्याने शेतीला कुठून येणार अशी परिस्थिती असल्याने गेल्या काही वर्षांपासून गव्हाचा पेरा कमी कमी होत चालला होता . यंदा समाधान कारक पाऊस पडल्याने विहिरी नाले तसेच साठवण बंधारे पाण्याने तुडुंब भरल्याने येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुमारे सात हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी केली होती.पेरणी नंतर पिक जोमदार आले .मात्र पिक वाढीच्या काळात वातावरणात बदल झाल्यामुळे गव्हावर मावा व करपा,तांबेरा या रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिके धोक्यात येऊन त्यांची वाढ खुंटली . शेतकºयांनी औषध फवारणी करून पिके जगविली .हजारो रु पये खर्च करूनही अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर पसरला आहे. एकरी पाच ते सहा क्विंटलपर्यंतच उत्पन्न निघत असल्याने गहू पिकासाठी केलेला केलेला उत्पादन खर्चही निघणे दुरापास्त झाल्याने गहू उत्पादक शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक