शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

यंदा गव्हाचा उत्पादन खर्च वाढला; उतारा मात्र घटला

By संजय दुनबळे | Updated: March 29, 2021 01:22 IST

 जिल्ह्याच्या ग्रामीण  भागात सध्या गहू सोंगणीचा हंगाम सुरु असून बहुसंख्य भागात गहू सोंगणी अंतिम टप्याट आली आहे. गहू काढण्यासाठी शेतकरी हार्वेस्टरचा वापर करत असून यंदा हार्वेस्टर चालकांनी मोठ्या प्रमाणात दरवाढ केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यावर्षी गव्हाच्या उताऱ्यावर परिणाम झालेला दिसत असून अनेक शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा उत्पादन खूपच कमी झाले आहे.

ठळक मुद्देसोंगणी अंतिम टप्प्यात : हार्वेस्टरचे दर वाढल्याने भुर्दंड

नाशिक:  जिल्ह्याच्या ग्रामीण  भागात सध्या गहू सोंगणीचा हंगाम सुरु असून बहुसंख्य भागात गहू सोंगणी अंतिम टप्याट आली आहे. गहू काढण्यासाठी शेतकरी हार्वेस्टरचा वापर करत असून यंदा हार्वेस्टर चालकांनी मोठ्या प्रमाणात दरवाढ केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यावर्षी गव्हाच्या उताऱ्यावर परिणाम झालेला दिसत असून अनेक शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा उत्पादन खूपच कमी झाले आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात बहुसंख्य शेतकरी गव्हाची पेरणी करत असतात. यातुन वर्षभराच्या धान्याची तजवीज तर होतेच शिवाय उत्पादन चांगले आले तर हाती दोन पैसेही येतात असे शेतकऱ्यांचे या पिकामागचे गणित असते. मागील दोन वर्षांपासून पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी असल्याने अनेक शेतकरी गव्हाचे पीक घेतात. ज्यांना कांदा बियाणे उपलब्ध झाले नाही त्यांनीही गव्हाचा पर्याय स्वीकारला आहे. जिल्ह्यात सर्वसाधारणपणे गव्हाचे क्षेत्र ६२४२५.२४ हेक्टर इतके गव्हाचे क्षेत्र असून यावर्षी ७२७६९.८० हेक्टर इतक्या क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कमीअधीक प्रमाणात गव्हाचा पेरा करण्यात आला आहे. यंदा बियाणे, खते, मशागत यांचा खर्च वाढलेला असतानाच ऐक सोंगणीच्यावेळी हार्वेस्टर चालकांनीही आपली दरवाढ केली असून एकरी १५००ते २००० रुपये याप्रमाणे दर आकारणी केली जाते. हार्वेस्टरमुळे धान्य वावरातुन थेट खळ्यापर्यंत येत असल्यामुळे अनेक शेतकरी हार्वेस्टरला पसंती देतात मात्र दरवाढीमुळे यंदा गव्हाचा उत्पादन खर्च वाढला आहे. वातावरणातील बदलामुळे यंदा गव्हाच्या उताऱ्यावर परिणाम झाला असून एकरी उत्पादन घटले आहे. ज्या शेतकऱ्यांना एकरी १५-१६ पोत्यांची अपेक्षा होती तेथे १० ते१२ पोत्यांवर समाधान मानावे लागले. 

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती