शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गहू, डाळींसह किराणा महागला ; लॉकडाऊनचा परिमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 13:43 IST

लॉकडाउनमध्ये विविध प्रकारच्या डाळी, गहू आणि तेलाचे भाव वाढले असून त्यामुळे बंदच्या काळात नागरिकांना घरातील मासिक किराणा मालाच्या खरेदीवर अधिक खर्च करावा लागतो आहे. डाळ मील चालकांनी केलेली भाववाढ, ट्रान्स्पोर्टचा वाढता खर्च आणि मजुरांची अपुरी संख्या यामुळे ही भाववाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊन मुळे किराणा माल महागला गहू, डाळींसह तेलाचे भावही वाढले

नाशिक : कोरोनामुळे सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये  विविध प्रकारच्या डाळी, गहू आणि तेलाचे भाव वाढले असून त्यामुळे बंदच्या काळात नागरिकांना घरातील मासिक किराणा मालाच्या खरेदीवर अधिक खर्च करावा लागतो आहे. डाळ मील चालकांनी केलेली भाववाढ, ट्रान्स्पोर्टचा वाढता खर्च आणि मजुरांची अपुरी संख्या यामुळे ही भाववाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत असून लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यास महागाईचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहरातील घाऊक व्यापाऱ्यांकडे किराणा मालाचा असलेला साठा आणखी काही दिवस राहणार आहे. त्यामुळे बहुतेक किराणा मालाचे भाव  वाढत असून  काबुली चना, उडीद डाळीची आयात बंद असल्याने काही प्रमाणात भाववाढ झाली असून अन्य डाळींच्या होलसेल दरातही गेल्या आठडाभरात वाढ झाल्याने बाजारात डाळी तेजीत आल्या आहेत. संचारबंदीच्या काळातही ग्राहकांकडून मॅगी, चायनीज वस्तूंचीही मागणी होत आहे. तुलनेत अशा प्रकारच्या ‘रेडी टू कूक’ पदार्थांचा पुरवठा तुलनेत कमी असल्याने अशा वस्तुंचाही तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, संचारबंदी अफवांमुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये घबराट असल्याने, त्याचा फायदादेखील काही व्यापारी व दुकानदार घेत आहेत. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक परतीच्या प्रवासाचेही भाडे आकारत आहेत. तसेच मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात गहू येत असल्यामुळे तेथील धान्य मंडई बंद असल्याचा परिणामही गहू दरवाढीवर होत आहे. 

आणखी दरात वाढ होण्याची शक्यता ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक आकारत असलेले रिटर्नचे भाडे, परराज्यातील धान्याची बंद असलेल्या मंडई, डाळ मिलचालकांनी केलेल्या भाववाढीमुळे डाळीचे, तेल आणि गव्हाच्या दरात वाढ झाली आहे. लॉकडाउन वाढल्यास आणखी दरात वाढ होण्याची शक्यता घाऊक धान्य किराणा व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकMarketबाजार