शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

तांदळाच्या आगारात गव्हाचे पीक जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 12:07 AM

कवडदरा : इगतपुरी तालुक्‍यातील कवडदरा, घोटी खुर्द, साकूर, भरवीर खुर्द, धामणगाव तांदळाचे आगार मानले जाते. परिसरातील विविध प्रकारचे उत्पादन घेतले जाणारे तांदूळ खूपच प्रसिद्ध असल्याने येथे मोठ्या प्रमाणात तांदळाचे पीक घेतले जाते. बहुतेक शेतकरी येथे भाताचीच लागवड करतात. अशा कवडदरा, घोटी गावात शिक्षक बंधूंनी गव्हाचे पीक घेतले आहे. शिक्षकी पेशातील या प्रगतीशील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत केलेले नवनवीन प्रयोग येथे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्याचप्रमाणे आतादेखील तरारुन आलेले गव्हाचे पीक चर्चेचा विषय ठरत आहे.

ठळक मुद्देइगतपुरी तालुका : शेतात शिक्षकांचा नावीन्यपूर्ण प्रयोग

कवडदरा : इगतपुरी तालुक्‍यातील कवडदरा, घोटी खुर्द, साकूर, भरवीर खुर्द, धामणगाव तांदळाचे आगार मानले जाते. परिसरातील विविध प्रकारचे उत्पादन घेतले जाणारे तांदूळ खूपच प्रसिद्ध असल्याने येथे मोठ्या प्रमाणात तांदळाचे पीक घेतले जाते. बहुतेक शेतकरी येथे भाताचीच लागवड करतात. अशा कवडदरा, घोटी गावात शिक्षक बंधूंनी गव्हाचे पीक घेतले आहे. शिक्षकी पेशातील या प्रगतीशील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत केलेले नवनवीन प्रयोग येथे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्याचप्रमाणे आतादेखील तरारुन आलेले गव्हाचे पीक चर्चेचा विषय ठरत आहे.भरवीर येथील शिक्षक बंधू लक्ष्मण व भरत झनकर यांनी नवीन प्रयोग करत शेतात गव्हाच्या पिकाची यशस्वी लागवड केली आहे. त्यांनी आपल्या पंधरा गुंठे क्षेत्रापैकी दहा गुंठे क्षेत्रात टोकन पद्धतीने श्रीराम जातीचे गव्हाचे पीक लावले.या वेगळ्या प्रयोगाची जोखीम स्वीकारत आणि त्याला परिश्रम व प्रयोगशीलतेची जोड देत पिकाची निगा राखली. परिणामी, गव्हाचे पीक जोमात आले आहे.एका किलोपासून शंभर किलो गव्हाचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरात गव्हाचीही शेती होऊ शकते, असा विश्‍वास अनेकांना आला आहे, तसेच शेताच्या बांधावर विविध फळांची झाडे तर काही भागात भाजीपाला घरगुती सेंद्रिय पद्धतीने केला असून, परिसरातील अनेक तरुण शेतकरी या शेतावर येऊन भेट देत पाहणी करत आहेत. कवडदरा परिसरातील शेतकरी पारंपरिक भात पिकाऐवजी दुसऱ्या पिकांकडे वळत आहे. भाताबरोबरच गहू, ज्वारी, पालेभाजांची शेती होऊ लागली आहे.(२२ कवडदरा)कवडदरा परिसरातील भाताच्या शेतात गव्हाचे पीक नवा प्रयोग.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती