शहरं
Join us  
Trending Stories
1
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
2
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
3
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
6
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
7
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
8
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
9
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
10
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
11
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
12
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
13
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
14
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
15
आयएसआयचं कपट कारस्थान, पण...., इराणमधून अशी झाली तीन अपहृत भारतीयांची सुटका 
16
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
17
Flipkart चा मार्ग मोकळा, आता ग्राहकांना थेट कर्ज देता येणार; RBI कडून मिळाली परवानगी
18
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!
19
"दुसऱ्याच मॅचवेळी त्याला फ्रॅक्चर...", आयपीएल फायनल हरल्यानंतर चहलसाठी आरजे महावशची पोस्ट
20
अमेरिकेतून आली "गुड न्यूज", रॉकेट बनले भारताचे संरक्षण क्षेत्रातील शेअर्स...! खरेदीसाठी लोकांची झुंबड

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनने घेतली धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 23:38 IST

सिन्नर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा जंग जंग पडत असताना सोशल मीडियामधून मात्र उलट सुलट संदेश प्रसारित करून अफवांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सायबर सेलने थेट कारवाईचा इशारा दिल्यानंतर अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनकडून ग्रुपची सेटिंग बदलण्यात येत असून, काही ठिकाणी बनविण्यात आलेले ग्रुपदेखील डिलीट केले जात आहेत.

ठळक मुद्देसिन्नर : अनेक ग्रुपच्या सेटिंगमध्ये बदल

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा जंग जंग पडत असताना सोशल मीडियामधून मात्र उलट सुलट संदेश प्रसारित करून अफवांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सायबर सेलने थेट कारवाईचा इशारा दिल्यानंतर अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनकडून ग्रुपची सेटिंग बदलण्यात येत असून, काही ठिकाणी बनविण्यात आलेले ग्रुपदेखील डिलीट केले जात आहेत.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधानांनी १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील आपापल्या कार्यक्षेत्रात जमाबंदी व संचारबंदीचा आदेश लागू केले आहेत. अशा परिस्थितीत सोशल मीडिया विशेषकरून व्हॉट्सअ‍ॅपवरून प्रसारित होणाºया कोरोनाबद्दलच्या संदेशांवर नियंत्रण नसल्याने अनेकदा अफवांचे पेव फुटून उलटसुलट चर्चांना उधाण आल्याच्या घटना घडल्या आहेत. इतर व्हॉॅट्सअ‍ॅप ग्रुपवरून आलेले संदेश खातरजमा न करता पुढे पाठवण्याचे प्रकार सर्रास घडत असल्याने वादाचे प्रसंगदेखील निर्माण झाले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सायबर सेलकडे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून प्रसारित होणाºया संदेशांवर लक्ष ठेवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.अनेक ग्रुप अ‍ॅडमिनने आपल्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये बदल करत इतर सदस्यांना संदेश पाठवण्यापासून रोखले आहे. त्याहीपुढे जात काही ग्रुप अ‍ॅडमिनकडून थेट ग्रुप रिमुव्ह करण्यात येत आहेत.सध्याच्या काळात सोशल मीडिया व विशेषकरून व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना सबुरीचा सल्ला घेण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आल्याने आता प्रत्येक जण आपल्याला येणाºया संदेशाची खातरजमा करूनच पुढे पाठवण्याची खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहे. ..धाबे दणाणले राज्याच्या विविध भागात पोलीस अधिकाऱ्यांकडून ग्रुप अ‍ॅडमिनला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून एखादा समाज विघातक संदेश किंवा अफवा पसरवणारा संदेश प्रसारित झाला तर व्यक्तिगत जबाबदार धरण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप एडमिनचे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :MobileमोबाइलWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप