शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

क्षनिष्ठेपेक्षा जो चुकला तो रिंगणाबाहेर...!

By admin | Updated: June 18, 2014 00:26 IST

क्षनिष्ठेपेक्षा जो चुकला तो रिंगणाबाहेर...!

 

 

स्वशक्तीचे सबलीकरण आणि त्यासाठी मग वाट्टेल ते करण्याची मानसिकता असणारे राजकारणी, जातीय समीकरण विरहित राजकारण आणि ज्याने कर्तव्यात कसूर केली त्यास घरचा रस्ता दाखविणारे मतदार ही निफाड विधानसभा मतदारसंघाची वैशिष्ट्ये आहेत. निफाडच्या राजकारणाचे रसायनच अजब आहे. कधी काळी शरद पवार यांच्यावर कमालीची निष्ठा ठेवणाऱ्या या मतदारसंघाचा रंग गेल्या काही वर्षांपासून बदलला आहे. पवार यांची भक्कम पाठराखण करणाऱ्या या मतदारसंघात रावसाहेब कदम यांच्या रूपाने प्रथम शिवसेनेने पाऊल रोवले. अर्थात तेव्हाही लोकांनी पक्ष नव्हे, तर व्यक्तिलाच डोळ्यासमोर ठेवले होते. आता येथील राजकारण पक्षनिहाय कमी गटातटावरच जास्त चालते. आपापसातल्या हेव्यादाव्यांमुळे आपल्याच पक्षाला दुर्बल करणारे येथे काही कमी नाहीत ! गत विधानसभा निवडणुकीच्या वेळी तत्कालीन आमदार दिलीप बनकर यांचा शिवसेनेचे अनिल कदम यांनी पराभव केला. खरे तर बनकर यांनी त्यांच्या कार्यकाळात विकासाकडे लक्ष केंद्रित केले होते; परंतु त्यांच्याभोवती खूशमस्करांचा वेढा पडला आणि त्यामुळे सामान्यजणांशी असलेला संवादही तुटला त्यामुळे बनकरांना पराभवाचा सामना करावा लागला. आता त्यातून बनकर बरेच काही शिकले आहेत! राजकारणाचा बदलला बाजतालुक्यातील नेतेमंडळी विविध पक्षांमध्ये वरिष्ठपदांवरून कारभार हाकीत असले तरी सद्यस्थितीत येथील सारेच राजकारण अनिल कदम आणि दिलीप बनकर यांच्या भोवतीच फिरत असल्याचे दिसते. दोघेही कार्यकर्त्यांत राहणारे, जनसंपर्क ठेवणारे, राजकारणाच्या प्रवासात सावध असणारे नेते आहेत. तालुक्यातील राजकारणाचा बाज गेल्या दशकात साफ बदलला आहे. भाजपाचे ज्येष्ठनेते प्रल्हाद पाटील कराड, माजीमंत्री विनायकदादा पाटील, भाजपाचे नेते सुरेशबाबा पाटील यांचा अपवाद वगळता निफाडचे अवघे राजकारण युवकांच्या हाती आले आहे. कॉँग्रेसमधील राजाराम पानगव्हाणे, शरद अहेर यांनी जिल्ह्याचे आणि प्रदेशपातळीवरील पक्षीय जबाबदारीची पदे सांभाळली असे असतानाही तालुकास्तरावर काँग्रेसचे काही नेते मात्र शिवसेनेकडे फरफटत गेल्याचा इतिहास आहे. गत विधानसभा निवडणुकीत दिलीप बनकर यांची पाठराखण करण्याऐवजी काँग्रेसचे भास्कर बनकरांसह काही नेत्यांनी विधानसभेला अनिल कदम यांना उघडपणे मदत केली. अर्थात तद्पश्चात या नेत्यांच्या पदरात निराशाच पडली.‘टायमिंग’साधणे जमलेच नाहीविद्यमान स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सारी सूत्रे दिलीप बनकर यांच्या हाती आहेत. त्यांनी गत पाच वर्षांत वीज, पाणी आणि शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले. मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलच्या नीलिमा पवार यांच्या गटाला उघडपणे मदत करून या गटाला आपलेसे केले. शिवाय मित्रपक्ष असणाऱ्या कॉँग्रेसमधील नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळेच निफाड पंचायत समितीत आघाडीची सत्ता येऊ शकली. मात्र असे असूनही जनतेच्या कामांसंदर्भात कदम यांची कार्यपद्धती आणि त्यांनी सोडलेल्या कच्च्या दुव्यांवर प्रहार करण्याचे टायमिंग मात्र बनकर यांना काही साधता आले नाही!बडी बडी मंडळी काँग्रेसचे जिल्हास्तरावर नेतृत्व करीत असताना तालुक्यात मात्र या पक्षाची स्थिती खूपच केविलवाणी आहे. जनतेच्या प्रश्नांवर या तालुक्यात गेल्या पाच वर्षांत कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वा तालुकाध्यक्षांनी काय केले हा संशोधनाचा विषय ठरेल. स्वबळावर काँग्रेस या तालुक्यात भक्कम का होऊ शकली नाही. काँग्रेसचे तालुक्यातील काही नेते वैयक्तिक स्वार्थासाठी शिवसेनेच्या नेत्याला कधी साथ देतात, तर कधी दुसऱ्या पक्षाच्या पालखीचे भोई होतात. तालुक्यातील शिवसेना कदम यांच्याभोवती गोठलेली आहे. लासलगाव बाजार समिती तसेच निफाड सहकारी साखर कारखान्यातील त्यांच्या गटाचे संचालक आणि जनसंपर्क ही कदमांची जमेची बाजू असली तरी प्रसिद्धीसाठी आक्रमकपणाच्या नादात वेळोवेळी केलेला आक्रस्ताळेपणा, स्पष्टोक्तीच्या नावाखालचा फटकळपणा आणि त्यामुळे दुरावलेली मने कदम यांच्यासाठी अडचणीचीही ठरू शकतात. भाजपाची ताकद तालुक्यात जरी काही प्रमाणात वाढली तरी त्या वाढीला मर्यादा आहेत. सेनेची साथ करून भाजपा वाटचाल करीत असताना भाजपाच्या स्थानिक नेत्यांना सत्तेपर्यंत पोहोचता आलेले नाही. पंचायत समिती निवडणुकीत भाजपाचे काय हाल झाले हे सर्वांना ज्ञात आहे. मोदी लाटेत राष्ट्रवादी भुईसपाटनुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत निफाडकरांनी युतीचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांची भक्कम पाठराखणकेली. त्यांना तब्बल एक लाखाहून अधिक मतांचे दान दिले. खरे तर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्यासाठी बनकर यांच्यासहित राष्ट्रवादीसह काँगे्रसच्या सर्वच नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र घराघरात जाऊन शेवटपर्यंत प्रचार पोहचविण्यात ते कमी पडले. एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे मतदार मोदी लाटेवर स्वार झाले. चव्हाण यांच्या मताधिक्यात त्यांच्या वैयक्तिक जनसंपर्क अथवा कदम यांचे प्रयत्न यापेक्षा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचा मुद्दाच जास्त प्रभावी राहिला. दुरंगीच लढत रंगणारयावेळच्या विधानसभा निवडणुकीतही दुरंगीच लढत रंगणार असून, बनकर आणि कदम हेच पुन्हा एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकण्याची दाट शक्यता आहे. असे असले तरी राष्ट्रवादीकडून ऐनवेळी नवा चेहरा पुढे येण्याची आणखी एक शक्यतादेखील वर्तविली जात आहे. कॉँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीच्या संसारात निफाडची जागा राष्ट्रवादीच्या वाट्यास आहे. सदर जागा कॉँग्रेसला मिळेल अशी आशा काही इच्छुकांना असून, तसे झाल्यास राजाराम पानगव्हाणे, शरद अहेर, दिगंबर गिते यांची नावे चर्चेत येऊ शकतात. केंद्रात सत्ता भाजपाची आल्याने निफाड तालुक्यात भाजपाला प्रभावशाली बनण्याची संधी आहे. ही संधी येथील भाजपेयी साधतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.गेल्या पाच वर्षांत खूप विकास झाल्याचे चित्र रंगविले जात असले तरी प्रत्यक्षात या मतदारसंघातील काही समस्या मात्र जैसै-थेच आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा कमी करणे, वीज उपकेंद्र वाढवून वीजटंचाई कमी करणे, गोदावरी नदीवर सायखेडा-चांदोरी पूल बांधणे, कुंदेवाडीला रेल्वेगेट येथे उड्डाणपूल बांधणे, बंद पडलेल्या उपसा जलसिंचन योजना सुरू करणे, मरणासन्न अवस्थेतील निफाड सहकारी साखर कारखाना वाचविणे, कांदा व टमाटा पिकासंदर्भात प्रक्रिया उद्योग उभे करणे, गंगाथडीच्या पट्ट्यातील गोदावरीच्या पाण्याने खराब होत चाललेल्या जमिनीचा पोत सुधारणे, पूर्व भागाच्या विकासासाठी सावरगाव भागात औद्योगिक वसाहत उभारणे, रानवड कारखाना-ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न करणे, निफाड, ओझर, पिंपळगाव (ब.) लासलगाव येथील पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे, निफाडला अद्ययावत भाजीपाला मार्केट उभारणे आणि अद्ययावत बसस्थानक उभारणे आदि समस्यांचे निराकरण कधी होईल याची मतदारांना प्रतीक्षा आहे.