शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दिलासा कसला, हा तर शेतकऱ्यांत फूट पाडण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 01:11 IST

शेती किंवा हरित क्षेत्रावर कर नसल्याचे सांगून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शेतकºयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला, तरी मुळातच शहरात शेतीक्षेत्र अवघे १७ टक्के उरले आहे. आणि ८७ टक्के रहिवासी क्षेत्रातदेखील शेतीक्षेत्र आहे.

नाशिक : शेती किंवा हरित क्षेत्रावर कर नसल्याचे सांगून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शेतकºयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला, तरी मुळातच शहरात शेतीक्षेत्र अवघे १७ टक्के उरले आहे. आणि ८७ टक्के रहिवासी क्षेत्रातदेखील शेतीक्षेत्र आहे. असे भूखंड करपात्र असणार आहेत. त्यामुळे शेतकºयांची ही फसवणूक असल्याच्या भावना राजकीय पक्ष आणि अन्याय निवारण कृती समितीने व्यक्त केल्या आहेत. इतकेच नव्हे तर आयुक्त शेतकºयांतच फूट पाडत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दुसरीकडे, मोकळ्या भूखंडांवरीलच नव्हे तर सर्वच प्रकारच्या करवाढीच्या विरोधात आता भाजपाने शड्डू ठोकला असून, येत्या १९ एप्रिल रोजी विशेष महासभा घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या करवाढीच्या विरोधात आंदोलन पेटू लागल्याने राजकीय पक्षही अस्वस्थ झालेदिलासा कसला हा तर शेतकºयात फुट पाडण्याचा डाव असून शेतकºयाच्या मेळाव्यास सर्व पक्षीय हजेरी लावू लागले आहेत. अनेक प्रतिनिधी मंडळे आयुक्तांना भेटू लागल्याने त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शेती क्षेत्रावर करच लागू नसल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र, त्यातून १७ टक्के हरित क्षेत्र असणाºयांनाच दिलासा मिळणार असून ८७ टक्के रहीवासी क्षेत्रात तब्बल ३५ टक्के शेतजमिन असून त्यांच्यावर करवाढींची टांगती तलवार कायम असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळणार नाही असे सांगण्यात येत आहे.भाजपा विशेष महासभा बोलावणारसंपूर्ण करवाढच रद्द करण्यासाठी १९ एप्रिल रोजी विशेष महासभा बोलावण्याचा निर्णय भाजपाकडून घेण्यात आला अहे. यासंदर्भात भाजपा आमदार बाळासाहेब सानप यांनी शेतीक्षेत्रात घरपट्टीचा कर आकारला जाऊ नये अशी भाजपाची भूमिका असून, आयुक्तांच्या निर्णयाने शहरातील शेतकरीही आत्महत्या करतील. त्यामुळे या निर्णयाला आमचा तीव्र विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका