शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पेठरोड मार्गाच्या कॉँक्रिटीकरणाचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:27 IST

अंदाजपत्रकात तरतूद नसताना सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्चून रस्त्यांचे डांबरीकरण व कॉँक्रिटीकरणाचा घाट घालणाºया सत्ताधारी भाजपाला स्वपक्षातीलच नगरसेवक कमलेश बोडके यांनी घरचा अहेर दिला असून, पंचवटीतील सुस्थितीतील पेठरोडचे कॉँक्रिटीकरण करण्यामागचे गौडबंगाल काय, असा सवाल उपस्थित केला आहे.

नाशिक : अंदाजपत्रकात तरतूद नसताना सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्चून रस्त्यांचे डांबरीकरण व कॉँक्रिटीकरणाचा घाट घालणाºया सत्ताधारी भाजपाला स्वपक्षातीलच नगरसेवक कमलेश बोडके यांनी घरचा अहेर दिला असून, पंचवटीतील सुस्थितीतील पेठरोडचे कॉँक्रिटीकरण करण्यामागचे गौडबंगाल काय, असा सवाल उपस्थित केला आहे. प्रशासनातील अधिकाºयांनी केलेल्या खोट्या सर्वेक्षणाबद्दलही बोडके यांनी आयुक्तांना पत्र लिहून आक्षेप घेतला आहे.सत्ताधारी भाजपासह प्रशासनाने २५६ कोटी रुपयांच्या रस्ते बांधणीचा घाट घातला आहे. त्यात पंचवटीतील प्रभाग क्रमांक ५ मधील पेठरोडवरील अर्ध्या कि.मी. मार्गासाठी ७.५० कोटी रुपये प्रस्तावित केले आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या या अजब कारभाराचे दर्शन घडवणाºया प्रकाराला आता प्रभागातील सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक कमलेश बोडके यांनीच लेखी पत्राद्वारे आक्षेप घेतला आहे. बोडके यांनी म्हटले आहे, प्रभागातील दत्तनगर, शनिमंदिर परिसर, नवनाथनगर, सुदर्शन कॉलनी, काळाराम मंदिर तसेच सुकेणकर लेन परिसरातील अंतर्गत रस्ते खराब झालेले असताना प्रशासनाकडून मात्र सुस्थितीत असलेल्या पेठरोडच्या कॉँक्रिटीकरणाचा घाट घातला जात आहे. सिंहस्थ काळातच सदर रस्ता पाच ते सहा कोटी रुपये खर्चून अतिशय चांगला करण्यात आलेला आहे. आता पुन्हा त्यावर जनतेच्या पैशांची उधळपट्टी कशासाठी? सदर रस्त्याच्या कामाला विरोध नाही, परंतु सुस्थितीतील रस्ता फोडून तो कॉँक्रिटीकरणाला आक्षेप आहे. सदरचा रस्ता खराब झाल्यानंतरच पुढे अंदाजपत्रकात तरतूद करत रस्त्याचे काम करण्यात यावे. केवळ अर्धाच कि.मी. रस्ता करण्यामुळे खोदकामाने नागरिक व वाहनांना येण्या-जाण्यास मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे पेठरोडचे काम न करता त्याऐवजी प्रभागातील नगरसेवकांना विश्वासात घेऊन अन्य रस्त्यांचा सर्व्हे करून अंतर्गत रस्ते पक्के करण्यात यावे, अशी सूचनाही बोडके यांनी केली आहे.सर्वेक्षणावर प्रश्नचिन्हदोन महिन्यांपूर्वी रस्त्यांचा सर्व्हे करूनच २५० कोटींच्या रस्ता बांधणीचा प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आल्याचा दावा शहर अभियंता उत्तम पवार यांनी केला आहे. मात्र, सुस्थितीतील पेठरोडवरील अर्ध्या कि.मी. मार्गाकरिता तब्बल ७.५० कोटी रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावाने बांधकाम विभाग संशयाच्या घेºयात असतानाच आता खुद्द प्रभागातील भाजपा नगरसेवकानेच सर्व्हेची पोलखोल केल्याने बांधकाम विभाग अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. पेठरोडप्रमाणेच अनेक चांगल्या रस्त्यांवर डांबर ओतले जाण्याची शक्यता असल्याने एकूणच सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.