शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जायखेड्याच्या वारकऱ्यांना पुुण्यात मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 13:58 IST

जायखेडा : तुकाराम बीजनिमित्त पंढरपुरहून देहूला निघालेल्या जायखेडा ता. बागलाण येथील दिंडीतील वारकऱ्यांना मद्यपान केलेल्या पाच ते सहा जणांनी शिवीगाळ करीत दगडाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार खडकी (पुणे) येथे घडला.

जायखेडा : तुकाराम बीजनिमित्त पंढरपुरहून देहूला निघालेल्या जायखेडा ता. बागलाण येथील दिंडीतील वारकऱ्यांना मद्यपान केलेल्या पाच ते सहा जणांनी शिवीगाळ करीत दगडाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार खडकी (पुणे) येथे घडला. या घटननंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असून, गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी कृष्णाई प्रतिष्ठान व परिसरातील वारकरी बांधवांकडून करण्यात येत आहे. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजता खडकी येथे घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांकडे तक्र ार अर्ज देण्यात आला आहे.दर वर्षीप्रमाणे यंदाही तुकाराम बीज निमित्त पंढरपुर ते देहू पायी दिंडी निघाली होती. या दिंडीमध्ये जायखेडा येथील वै. कृष्णाजी माऊलींच्या शिष्यांसह ९५० वारकरी सहभागी झाले होते. मंगळवारी दुपारी एक वाजता ही दिंडी खडकीतील किर्लोस्कर कंपनीजवळील ब्राऊन चेरी येथे पोचली. त्यावेळी मद्यपान केलेल्या पाच जणांनी वारकºयांना शिवीगाळ करीत त्यांच्यावर दारु च्या बाटल्या फेकल्या व १८ ते २० वारकºयांना त्यांनी काठीने व दगडाने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती काही वारकºयांनी जायखेडा येथील मूळ रहिवासी व पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार गोसावी यांना मोबाईल द्वारे कळवताच त्यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकार्यांशी संपर्क साधून पोलिसांची मदत मिळून दिली. त्यानंतर कडेकोट बंदोबस्तात दिंडी देहूकडे रवाना करण्यात आली. या प्रकरणातील गुंड फरार झाले असून, या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणी धनंजय महाजन, केशव सोनवणे, शशिकांत बच्छाव, नानाजी बच्छाव निवृत्ती अहिरे, यशवंत गांगुर्डे, अनिल अहिरे, रविंद्र अहिरे, गंगाराम चव्हाण, भूषण बोरसे, धनंजय अहिरे, विष्णू घुले, संजय देवरे, सुनील जगताप यांच्यासह १५ वारकºयांनी पोलिसात तक्र ार दिली आहे. गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक