शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

भीज पाऊस व ढगाळ हवामानाने मुगाला फुटले कोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 18:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पाटोदा : परिसरात गेल्या बारा-तेरा दिवसांपासून होत असलेल्या भीज पावसाने तोडणीसाठी आलेल्या मुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुगाला मोठ्या प्रमाणात कोंब फुटले असून ढगाळ व दमट वातावरणाने सोयाबीन पिकावर भुंगा, अळी व शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव तर मका बिटीवर अमेरिकन अळीचा विळखा वाढला आहे. तसेच भीज पावसाने मका व बाजरी आडवी झाली असून टोमॅटो पिकावर विविध बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढल्याने संपूर्ण पिक धोक्यात आले आहे. याबरोबरच लागवड योग्य कांदा रोपेही या पावसाने खराब झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदीलमका, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : परिसरात गेल्या बारा-तेरा दिवसांपासून होत असलेल्या भीज पावसाने तोडणीसाठी आलेल्या मुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुगाला मोठ्या प्रमाणात कोंब फुटले असून ढगाळ व दमट वातावरणाने सोयाबीन पिकावर भुंगा, अळी व शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव तर मका बिटीवर अमेरिकन अळीचा विळखा वाढला आहे. तसेच भीज पावसाने मका व बाजरी आडवी झाली असून टोमॅटो पिकावर विविध बुरशीजन्य रोगांचे प्रमाण वाढल्याने संपूर्ण पिक धोक्यात आले आहे. याबरोबरच लागवड योग्य कांदा रोपेही या पावसाने खराब झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.यंदा सुरु वातीपासूनच समाधानकारक पावसाने खरीपाची पिके जोमदार आली आहे. मात्र, सध्या सोयाबीन पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव वाढला असून अळ्यांनी पाने खाल्याने पानांची चाळणी झाली आहे. फुलोऱ्यातील सोयाबीनची फुले तसेच शेंगा या अळ्यांनी कुरतडून टाकल्याने उत्पन्नात मोठी घट येण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. अळीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी वर्ग उंच वाढलेल्या सोयाबीन पिकात आपला जीव धोक्यात घालून औषधांची फवारणी करतांना दिसत आहे.मुगाचे पिक साधारणत: दोन सव्वा दोन मिहन्यात काढणीसाठी येत असल्याने कांद्याच्या क्षेत्रात मुगाची मोठया प्रमाणात लागवड परिसरात केली जाते. यातून शेतीही चांगली राहाते तसेच शेतीसाठी भांडवल उपलब्ध होत असल्याने शेतकरी वर्ग मुगाची लागवड करीत असतात मात्र सततच्या भीज पावसाने हे पिक खराब झाल्याने शेतकरी आणखीनच अडचणीत सापडला आहे.यावर्षी सोयाबीन बियाणे खराब निघाल्याने शेतकर्?यांना सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली असे असले तरी समाधानकारक पावसाने पिक चांगले आले आहे.दोन दिवसांपासून परिसरात पावसाने उघडीप दिली असल्याने बाजरीची कापणी तसेच कांदा लागवडीसाठी शेत तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे.चौकट -सुरु वातीपासूनच समाधानकारक पाऊस पडत असल्याने पिके चांगली आली मात्र पिकांची फक्त वाढच झाली आहे. विविध किडी व रोगांमुळे सोयाबीनला शेंगा कमी आल्या असून आलेल्या शेंगाही अळींनी कुरतडल्यामुळे उत्पन्नात मोठी घट येणार आहे.- अनिल कव्हात, सोयाबीन उत्पादक शेतकरी, ठाणगाव.(फोटो २६ पाटोदा, २६ पाटोदा २))

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी