शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिमच्या सभापतींचे आंदोलन : उद्यानांच्या दुरवस्थेकडे वेधले लक्ष महापालिकेच्या उद्यान विभागाला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 01:42 IST

शहरातील उद्यानांची होत चाललेली बकाल स्थिती, अपुरा कर्मचारीवर्ग, एकाच उद्यान निरीक्षकाकडे सहाही विभागांचा कार्यभार, वाहतूक बेटांसह दुभाजकांची झालेली दुरवस्था या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पश्चिम प्रभाग समितीच्या सभापती व कॉँग्रेसच्या नगरसेवक डॉ. हेमलता पाटील यांनी शनिवारी (दि.१६) महापालिका मुख्यालयातील उद्यान विभागाला टाळे ठोकले.

ठळक मुद्देआंदोलन करत निषेधही नोंदविलाउद्यान विभागाच्या कामकाजाबद्दल आक्षेप

नाशिक : शहरातील उद्यानांची होत चाललेली बकाल स्थिती, अपुरा कर्मचारीवर्ग, एकाच उद्यान निरीक्षकाकडे सहाही विभागांचा कार्यभार, वाहतूक बेटांसह दुभाजकांची झालेली दुरवस्था या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पश्चिम प्रभाग समितीच्या सभापती व कॉँग्रेसच्या नगरसेवक डॉ. हेमलता पाटील यांनी शनिवारी (दि.१६) महापालिका मुख्यालयातील उद्यान विभागाला टाळे ठोकले. यावेळी, विभागाच्या कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन करत निषेधही नोंदविला.पश्चिम प्रभाग समिती सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी शनिवारी गनिमी काव्याने महापालिकेत आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश मिळविला आणि शस्त्रधारी सुरक्षा रक्षकांनाही चकवा देत थेट तिसºया मजल्यावरील उद्यान विभागाचे कार्यालय गाठले. डॉ. पाटील यांनी सर्वप्रथम उद्यान विभागात कार्यरत असलेल्या प्रभारी उद्यान अधिक्षकासह सर्व कर्मचाºयांना बाहेर काढले. यावेळी, विभागाच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्याची तयारी असल्याचे उद्यान अधीक्षक बी. यू. मोरे यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी आपला शेवटचा दिवस असल्याचे सांगत आपल्याला त्यात ओढू नये, अशी विनंती डॉ. पाटील यांना केली आणि ते आपल्या कक्षात निघून गेले. त्यामुळे, डॉ. पाटील यांनी उद्यान विभागातीलच आतील एका कक्षाला कुलूप ठोकत आंदोलन केले. त्यानंतर, विभागाच्या प्रवेशद्वारावर येत त्यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन करत उद्यान विभागाच्या कामकाजाबद्दल आक्षेप नोंदविला.