शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कोंबड्यांची शिकार करायला गेला अन् बिबट्या खुराड्यात अडकला; नाशिकच्या कळवणमध्ये आश्चर्यकारक घटना

By अझहर शेख | Updated: August 9, 2023 17:59 IST

वनाधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी साधनसामुग्रीसह धाव घेतली.

अझहर शेख, नाशिक :बिबट्याचे माहेरघर अशीच जणू नाशिकची ओळख झालेली आहे. नाशिक शहराच्या आजुबाजुला तसेच जिल्ह्यातसुद्धा बिबट्यांचा वावर हा मोठ्या प्रमाणात आढळून येतो. कळवण तालुक्यातील नवी बेज गावाच्या शिवारात एका शेतामध्ये बुधवारी (दि.९) पहाटेच्या सुमारास कोंबड्यांची शिकार करण्यासाठी गेलेल्या जेमतेम वर्षे दीड वर्षे वयाचा बिबट्याचा बछडा खुराड्यात अडकला. ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी वनखात्याला माहिती कळविली. वनाधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी साधनसामुग्रीसह धाव घेतली.

नाशिक जिल्ह्यात सध्या बिबट्यांचा वावर हा सर्वच तालुक्यांमध्ये कमी-जास्त फरकाने आढळून येतो. बिबट्याच्या हल्ल्यात कधी पशुधनाची हानी होते, तर कधी मनुष्य जखमी होण्याच्याही घटना घडतात. अनेकदा बिबटे विहिरींमध्ये कोसळतात तर कधी वाहनांखालीही चिरडले जाऊन त्यांचा मृत्यू होतो. जिल्ह्यात मानव-बिबट संघर्ष उद्भवणार नाही, यासाठी वनविभागाचे प्रयत्नही सुरू आहे. मात्र काही तालुक्यांमध्ये हे प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाही.नाशिक पुर्व वनविभागाच्या हद्दीतील कळवण वनपरिक्षेत्रातील नवी बेज गावात एका शेतातील घराजवळ असलेल्या कोंबड्यांच्या खुराड्याजवळ बिबट्या दबक्या पावलाने आला. कोंबड्यांची शिकार करण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि तो रिकाम्या असलेल्या खुराड्यात जाऊन अडकला. बिबट्याचे गुरगुरणे व डरकाळ्या फोडणे सुरू होताच शेतकऱ्यांचे लक्ष वेधले गेले. त्यांनी त्वरित खुराड्याजवळ धाव घेतली आणि खुराडा हा व्यवस्थित बंद करून घेतला. लाकडी बल्लीच्या सहाय्याने तो पिंजरा उचलून शेतातून बाहेर आणला. कळवण वनपरिक्षेत्राचे पथक मोठ्या पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले.

नैसर्गिक अधिवासात सोडणार

खुराड्यातील बिबट्याच्या बछड्याला बेशुद्ध करून मोठ्या पिंजऱ्यात स्थलांतरीत करण्यात आले व सुरक्षितरित्या त्यास वनपरिक्षेत्र कार्यालयात हलविण्यात आले. बिबट्याचा बछडा नर असून त्याची प्रकृती चांगली आहे. वय अंदाजे दीड वर्षे असल्याचे उपवनसंरक्षक कार्यालयातील वनाधिकाऱ्यांनी सांगितले. बछड्याला नैसर्गिक अधिवासात बुधवारी मध्यरात्री सोडण्यात येईल, असे कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक