शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेश निर्णयाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:39 IST

केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. यामुळे भारतीय घटनेला अपेक्षित असणारी स्त्री-पुरुष समानता केवळ कागदावरच न राहता प्रत्यक्ष आचरणात येऊ शकेल.

नाशिक : केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. यामुळे भारतीय घटनेला अपेक्षित असणारी स्त्री-पुरुष समानता केवळ कागदावरच न राहता प्रत्यक्ष आचरणात येऊ शकेल.  महिलांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक निर्णय होत असल्याबद्दल महिला कार्यकर्त्यांनी आनंदही व्यक्त केला आहे. त्याचबरोबर प्रथा, परंपरांचे पालन व्हावे अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. या निर्णयाची पूर्ण अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षातील महिला यांनी व्यक्त केली आहे. याबाबत विविध प्रतिनिधींशी साधलेला हा संवाद. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या आणि विविध क्षेत्रातील महिलांनी सांगितले की, पुरुषांप्रमाणेच महिलांनादेखील धार्मिक क्षेत्रात अधिकार असणे आवश्यक आहे. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयामुळे महिलांना आपला अधिकार प्राप्त झाला आहे.  चांगला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मंदिरांमध्ये प्रवेशासाठी महिलांना लढा द्यावा लागतो हीदेखील चिंतेची बाब आहे. देशात समान अधिकार आहेत, पण जातीची ताकद, अंधश्रद्धा याची घट्ट पकड असल्यामुळे अनेक बाबतीत महिलांना दुय्यमता अनुभवावी लागते. काळानुरूप बदल झाले पाहिजे.- रोहिणी नायडू, भाजपा महिला आघाठीपूर्वीपासून ज्या प्रथा, परंपरा चालू आहेत त्या बदलू नये. त्यामागे काही कारणे असतात. त्याचा विचार झाला पाहिजे. ज्या मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश आहे, तेथे त्यांनी आवश्य जावे, मात्र जेथे प्रवेश नाही तेथे आग्रह धरू नये. सिद्धस्थानांकडे गांभीर्यानेच पाहिले पाहिजे. - दिनेश गायधनी, प्राचार्य वेद पाठशाळा.कुठल्याही महिलेला कुठल्याही मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे. महिलांना निर्माण करणाऱ्या देवापर्यंत महिलांना जाता येत नसेल तर त्याला काही अर्थ नाही. देशात ज्या ज्या बाबतीत महिलांवर अन्याय होते.  - प्रेरणा बलकवडे, जिल्हाध्यक्ष, राष्टवादी कॉँग्रेस महिला आघाडी.शबरीमाला मंदिरात महिलांना खुला केलेला प्रवेश हा निर्णय स्वागतार्ह आहे. घटनेला अनुसरून हा निर्णय देण्यात आला आहे. धार्मिकस्थळी लिंगभेद मानने हे चुकीचे आहे, अशी घटना सांगते. केरळ हे प्रगत राज्य आहे. मात्र महिलांबाबत असा दुजाभाव तेथे केला जात होता. आता या निर्णयामुळे महिलांना न्याय मिळू शकेल. - महेंद्र दातरंगे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

टॅग्स :TempleमंदिरReligious Placesधार्मिक स्थळे