शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

भगवान अरिहंत मूर्तीच्या पाषाणाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 01:16 IST

चांदवड  तालुक्यातील मालसाणे येथील  णमोकार तीर्थ येथे ज्ञानयोगी देवनंदी गुरुदेव यांच्या संकल्पनेमधून साकारण्यात येणाऱ्या भगवान अरिहंत मूर्तीसाठी ३६५ टन वजनाचा अखंड पाषाण चांदवड शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर आला असता, शहरातील सर्व भाविकांनी  महापाषाणाचे जोरदार स्वागत केले. 

ठळक मुद्देमालसाणेत साकारणार मूर्ती : ३६५ टन वजनाच्या अखंड पाषाणाचा प्रवास

चांदवड :  तालुक्यातील मालसाणे येथील  णमोकार तीर्थ येथे ज्ञानयोगी देवनंदी गुरुदेव यांच्या संकल्पनेमधून साकारण्यात येणाऱ्या भगवान अरिहंत मूर्तीसाठी ३६५ टन वजनाचा अखंड पाषाण चांदवड शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर आला असता, शहरातील सर्व भाविकांनी  महापाषाणाचे जोरदार स्वागत केले. मूर्तीची प्रतिष्ठापना श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली यांच्या मूर्तीच्या धर्तीवर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी कर्नाटकमधील बेंगलोर जवळच्या देवनहळ्ळी येथून हा ३६५ टन वजनाचा क्रिम कलरचा ग्रेनाईट पाषाण १४४ टायरच्या ट्रेलरमधून आणण्यात आला आहे. हैदराबाद सोलापूर, मोहोळ, मोडलिंब, करमाळा, नगर, शिर्डी, येवला, मनमाड, मालेगाव मार्गे शुक्रवारी  (दि. ४) दुपारी चांदवड शहरात या महाकाय पाषाणाचे आगमन झाले. यावेळी  दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र कासलीवाल, उपाध्यक्ष सुभाष अजमेरा, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, जव्हारीलाल संकलेचा, ईश्वर बाफना, मांगीलाल कासलीवाल, केशरचंद पाटणी, मोहनलाल अजमेरा,  ॲड. राजेंद्र कासलीवाल, राजेंद्र अजमेरा, दर्शन अजमेरा, शांतिलाल कासलीवाल, वर्धमान पांडे, प्रवीण कासलीवाल, चंद्रशेखर कासलीवाल, संजय महाजन, योगेश अजमेरा, अल्केश अजमेरा, सुनील डुंगरवाल, पराग कासलीवाल,  अंकुर कासलीवाल रूपेश अजमेरा, मोनू कासलीवाल, अनिल महाजन, नीलेश अजमेरा, महेंद्र अजमेरा यांनी सामूहिक शांती मंत्राचे पठण करत महाकाय पाषाणास पुष्पहार घालून स्वागत केले.  महेंद्र कंकरेज, शरद बोराडे, राजू बिरार यांनीही चांदवडकरांच्यावतीने या या पाषाणाचे स्वागत केले.येवल्यातही जैन बांधवांकडून उत्स्फूर्त स्वागतयेवल्यात जैनबांधवांकडूनही  या अखंड पाषाणाचे स्वागत करण्यात आले.  यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, विजय श्रीश्रीमाळ, नंदकुमार अट्टल, अलकेश कासलीवाल, मनोज कासलीवाल, विजय अट्टल यांनी सामूहिक शांतीमंत्राचे पठण करत महाकाय पाषाणास पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी वाहनचालक व त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मानही करण्यात आला. याप्रसंगी भरत काले, संतोष काले, हितेश पहाडे, सुनील कासलीवाल, यश कासलीवाल, सागर पांडे, प्रितेश पहाडे, अंकाई सरपंच नगीना कासलीवाल, साधना काले, अर्चना कासलीवाल, मंजुषा काले शर्मिला कासलीवाल, सोनाली कासलीवाल, पद्मा कासलीवाल, पुष्पा कासलीवाल आदी उपस्थित होते. 

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रमJain Templeजैन मंदीर