ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 10- "ज्ञानोबा माऊली तुकाराम" असा जयघोष करत त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी शनिवारी ( १० जून) नाशिक शहरात दाखल झाली. यावेळी नाशिक महानगर पालिकेतर्फे त्र्यंबकरोडवरील स्वात्यंत्रवीर सावरकर जलतरण तलावाच्या प्रांगणात या दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी उपमहापौर प्रथमेश गीते, पोलीस आयुक्त डॉ रवींद्रकुमार सिंगल, दिनकर पाटील, हेमलता पाटील, गुरमित बग्गा, भक्तीचरणदास महाराज यांच्यासह देवस्थानचे अध्यक्ष संजय महाराज धोंडगे, नरहरी उगलमुगले, पुंडलीकराव थेटे आदी उपस्थित होते.