शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाचे प्रकाशमान स्वागत : स्वामी मित्रमेळाने जपली परंपरा सहस्त्रदीप प्रज्वलनाने उजळले रामकुंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 01:18 IST

पंचवटी : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करताना भारतीय संस्कृतीचे महत्त्व टिकून राहावे यासाठी पेठरोडवरील शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्रमेळा विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संध्येला गोदाकाठावर शेकडो नाशिककरांच्या उपस्थितीत सहस्त्रदीप प्रज्वलन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देनववर्षाचे स्वागत भक्तिमय वातावरणातगेल्या १५ वर्षांपासून नववर्षाचे स्वागत

पंचवटी : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करताना भारतीय संस्कृतीचे महत्त्व टिकून राहावे यासाठी पेठरोडवरील शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्रमेळा विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संध्येला गोदाकाठावर शेकडो नाशिककरांच्या उपस्थितीत सहस्त्रदीप प्रज्वलन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. पंचम गुरू पीठाधिश्वर स्वामी सखा सुमंत सरस्वती यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.नववर्षाचे स्वागत भक्तिमय वातावरणात आणि शांततामय वातावरणात करावे तसेच भारतीय संस्कृतीचे कायम जतन व्हावे याच उद्देशाने पेठरोडवरील शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्रमेळा विश्वस्त मंडळाने यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १५ वर्षांपासून नववर्षाचे स्वागत गोदावरी नदीकिनारी रामकुंडावर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलित करून करण्यात येते. कार्यक्रमाचे संयोजन शिवनेरी युवक मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सचिन ढिकले यांनी केले होते. रात्री साडेआठ वाजता सहस्त्रदीप प्रज्वलन सोहळ्यापूर्वी पार्श्वगायक रवींद्र साठे, मीना परुळेकर यांचा भक्तिधारा हा कार्यक्र म झाला. त्यानंतर पंचम गुरू पीठाधिश्वर स्वामी सखा सुमंत सरस्वती यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. मध्यरात्री १२ वाजता स्वामी सखा यांच्या हस्ते प्रज्वलित दीप नदीपात्रात सोडण्यात येऊन सहस्त्रदीप प्रज्वलन सोहळा संपन्न झाला. या सहस्त्रदीप प्रज्वलन सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केल्याने तसेच नदीपात्रात दीप सोडल्याने संपूर्ण गोदाकाठ उजळून निघाला होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन ढिकले, राजेंद्र पाटील, पुष्कर अवधुत, अ‍ॅड. अजय निकम, अजय गोसावी, गिरीश कोठुळे, प्रशांत कर्पे, संदीप ताजणे, राजू भोईर, विलास खालकर, जगदीश मान, दिनेश महाजन, बाळू खराटे आदींसह शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्रमेळा विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.