शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक गुढी उभारून नववर्षाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:10 IST

निफाड : गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाची सुरु वात करणारा, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा, भारतीय सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा सण. पाडव्यानिमित्त वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर निफाड शाळेत शैक्षणिक गुढी उभारून नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देनिफाड : टाकाऊ वस्तूतून साकारली आकर्षक गुढीकडुनिंबाचे विविध औषधी उपयोग व महत्व पटवून दिले

निफाड : गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाची सुरु वात करणारा, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा, भारतीय सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा सण. पाडव्यानिमित्त वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर निफाड शाळेत शैक्षणिक गुढी उभारून नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त प्रल्हाद पाटील कराड, संस्थापक विश्वस्त वि. दा. व्यवहारे, सचिव रतनपाटील वडघुले, शिक्षण विस्तार अधिकारी एस. बी. थोरात, मुख्याध्यापक अलका जाधव यांच्या हस्ते या शैक्षणिक गुढीचे पूजन करण्यात आले. शिक्षक गोरख सानप यांनी वाया गेलेल्या सायकलच्या रिंगा, टीव्ही, फ्रीज, वह्या यांच्या पुठ्ठ्यांचा वापर करून आकर्षक गुढी उभारली. या गुढीला भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान अशा विविध विषयांच्या शैक्षणिक साहित्याने सजविण्यात आले. आनंददायी पद्धतीने मुलांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून उभारलेली गुढी पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी मोठी गर्दी केली होती.याप्रसंगी वि. दा. व्यवहारे यांनी मुलांना गुढीपाडवा या सणाची माहिती समजावून सांगितली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून गुढीचे पूजन केले. मुलांना कडुनिंब व साखर यांचा प्रसाद वाटण्यात आला. किरण खैरनार यांनी कडुनिंबाचे विविध औषधी उपयोग व महत्व पटवून दिले. शैक्षणिक गुढी उभारून साक्षरतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक विश्वस्त अ‍ॅड. ल. जि. उगावकर, राजेंद्र राठी, अ‍ॅड. दिलीप वाघवकर, किरण कापसे, राजेश सोनी, मधुकर राऊत, प्रभाकर कुयटे, गटशिक्षणअधिकारी सरोज जगताप, केंद्रप्रमुख व्ही. के. सानप व पालकांनी स्वागत, तर गावकºयांनी कौतुक केले.