शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

दुर्गम भागात मुलींच्या जन्माचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:25 IST

इगतपुरी तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागात गव्हांडे गाव ‘मुलीच्या जन्माचे स्वागत’ करणारे गाव व शाळा म्हणून हे गाव नावारूपास येत आहे.

ठळक मुद्देघोटी : गव्हांडे गावात शिक्षकांच्या उपक्र मातून सामाजिक संदेश

गव्हांडे येथील दरवडे परिवाराच्या स्वागतप्रसंगी श्रीराम आहेर. समवेत मुख्याध्यापक संजय कोळी, संजय येशी, तुषार धांडे, मनीषा वाळवेकर आदी.भास्कर सोनवणे ।घोटी : इगतपुरी तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागात गव्हांडे गाव ‘मुलीच्या जन्माचे स्वागत’ करणारे गाव व शाळा म्हणून हे गाव नावारूपास येत आहे.कुटुंबात जन्माला आलेल्या एका कन्या रत्नाचा व सन्मान करून एक वेगळी सामाजिक शिकवण येथील शिक्षकांनी देत अनोखा संदेश दिला आहे. गव्हांडे येथील आदिवासी कुटुंबातील वाळू भगीरथ दरवडे व मंदा वाळू दरवडे या परिवारात जन्माला आलेल्या स्त्री जन्माचे अनोखे स्वागत करण्यात आले. ‘लक्ष्मी आली घरा तो ची दिवाळी दसरा’ या न्यायाने मुलगी जन्माला आली म्हणून मुलीच्या घरापासून ते शाळेपर्यंत त्या नवजात बालिकेची तिच्या आईसह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत केंद्रप्रमुख श्रीराम आहेर, मुख्याध्यापक संजय कोळी व गावकऱ्यांसह सर्व शिक्षक सहभागी झाले होते. याप्रसंगी मुख्याध्यापक संजय कोळी, पदवीधर शिक्षक संजय येशी, तुषार धांडे, उपशिक्षिका मनीषा वाळवेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार धांडे यांनी, तर आभार मनीषा वाळवेकर यांनी मानले.वंशाचा दिवा म्हणून आजही मुलाच्या जन्माचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येते. मात्र येथे शाळा व शिक्षकांच्या वतीने मुलीच्या जन्माचे स्वागत केले जाते ही खरोखरच अभिनंदनीय बाब आहे.- श्रीराम आहेर, केंद्रप्रमुख नांदगावसदोआमच्यासारख्या आदिवासी कुटुंबात पहिलीच मुलगी जन्माला आली. आमच्या घरात नाही, पण गावात आणि शाळेत एवढा मोठ्या सणासारखा उत्सव होईल असे वाटले नव्हते. या कार्यक्र मामुळे मला मनापासून आनंद झाला. - मंदा वाळू दरवडे, मुलीची आई

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकास