महाराष्ट्र सदन कथित घोटाळाप्रकरणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, समीर भुजबळ, पंकज भुजबळ व इतरांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर भुजबळ यांनी येवला दौरा केला. यावेळी येवलेकरांनी त्यांचे जल्लोषात स्वागत करत भव्य सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, ज्येष्ठ नेते आंबदास बनकर, अरुण थोरात, जिल्हा परिषद सदस्य महेंद्रकुमार काले, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, नवनाथ काळे, हुसेनभाई शेख, विश्वासराव आहेर, कृष्णराव गुंड, रावसाहेब आहेर, ज्ञानेश्वर शेवाळे, विनोद जोशी, ॲड. बाबासाहेब देशमुख, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, प्रकाश वाघ, नगरसेवक दीपक लोणारी, शिवसेना शहरप्रमुख राजाभाऊ लोणारी, भास्कर कोंढरे, किसनराव धनगे, योगेश जहागीरदार, मकरंद सोनवणे, सचिन सोनवणे, अविनाश कुक्कर, उत्तम घुले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो- १२ येवला भुजबळ
येवला येथे छगन भुजबळ यांच्यावर पुष्पवृष्टी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
120921\12nsk_12_12092021_13.jpg
फोटो- १२ येवला भुजबळ