शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रक्रियेविना वजन घटले :भारतात प्रथमच नाशिकला प्रयोग

By admin | Updated: June 7, 2017 22:38 IST

वजन घटविण्यासाठी केवळ बॅरीएट्रीक इन्बोलायजेशन उपचार पद्धतीने जठरातील हार्माेन कमी करून सहा महिन्यांत २५ टक्के वजन घटविण्याचा प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वजन कमी करण्यासाठी जोखमीच्या शस्त्रक्रिया करून जिवावर बेतण्याचे अनेक प्रकार उघड झालेले असताना, वजन घटविण्यासाठी केवळ बॅरीएट्रीक इन्बोलायजेशन उपचार पद्धतीने जठरातील हार्माेन कमी करून सहा महिन्यांत २५ टक्के वजन घटविण्याचा प्रयोग भारतात प्रथमच नाशिकला राबविला जात असल्याचा दावा येथील डॉ. सुजित कदम यांनी केला आहे.डॉ. सुजित कदम यांच्या रुग्णालयात उमराणे (ता. देवळा) येथील तब्बल १४० किलो वजन असलेल्या कैलास गायधनी या ४५ वर्षीय रुग्णावर हा प्रयोग बुधवारी (दि.७) करण्यात आला असून, त्यांना लगेचच गुरुवारी (दि.८) रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याचे डॉ. सुजित कदम यांनी सांगितले. वजन कमी करण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत अत्यंत किचकट आणि जोखमीच्या शस्त्रक्रिया रुग्णांवर करण्यात येतात. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्चही येतो. शिवाय शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णाला सरासरी १५ ते २० दिवस रुग्णालयातच उपचार घ्यावे लागतात. मात्र बॅरीएट्रीक इन्बोलायजेशन या अत्यंत जुजबी व सोप्या पद्धतीने लठ्ठ व्यक्तीचे सहा महिन्यात एकूण २५ टक्के वजन कमी करता येते. जर्मनी, अमेरिकेत ही पद्धत अवलंबिली जाते. उमराणे येथील कैलास गायधनी यांचे १४० किलो वजन घटविण्यासाठी कोणतीही जोखीम न स्वीकारता या पद्धतीने उपचार करण्याचा सल्ला माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे व आमदार डॉ. राहुल अहेर यांनी कैलास गायधनी यांना दिला. त्यांना कॉलेजरोडवरील व्हीजन रुग्णालयात मंगळवारी (दि.६) सायंकाळी दाखल करण्यात आले. बुधवारी त्यांच्यावर डॉ. सुजित कदम व डॉ. अमोल भालेराव यांनी बॅरीएट्रीक इन्बोलायजेशन पद्धतीने अ‍ॅन्जीओग्राफी करून त्यांच्या जठरातील ग्रेलीन हार्माेन कमी करण्यात आले. या ग्रेलीन हार्मोनमुळेच जास्त भूक लागून मनुष्य जास्त जेवण करतो परिणामी त्याचे वजन वाढते. या उपचार पद्धतीनंतर भूक कमी लागून सहा महिन्यांत एकूण २५ टक्के वजन कमी होत असल्याचे डॉ. सुजित कदम यांनी सांगितले.९