शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चतुर्थश्रेणी कर्मचाºयाच्या माथी उद्यान निरीक्षकाचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 18:56 IST

सिडको : येथील सहा प्रभागांमधील मनपाच्या ताब्यात असलेल्या सुमारे ३० हून अधिक उद्यानांतील वाढलेले गाजरगवत, धोकादायक असलेल्या झाडांच्या फांद्या कमी करणे, वाहतूक बेट तसेच दुभाजकातील स्वच्छता करणे, नवीन वृक्ष लावणे व दैनंदिन स्वच्छता राखणे आदी कामांसाठी महापालिकेच्या सिडको उद्यान विभागात पन्नासहून अधिक कर्मचारी असणे गरजेचे असताना सध्या हे सर्व काम ...

सिडको : येथील सहा प्रभागांमधील मनपाच्या ताब्यात असलेल्या सुमारे ३० हून अधिक उद्यानांतील वाढलेले गाजरगवत, धोकादायक असलेल्या झाडांच्या फांद्या कमी करणे, वाहतूक बेट तसेच दुभाजकातील स्वच्छता करणे, नवीन वृक्ष लावणे व दैनंदिन स्वच्छता राखणे आदी कामांसाठी महापालिकेच्या सिडको उद्यान विभागात पन्नासहून अधिक कर्मचारी असणे गरजेचे असताना सध्या हे सर्व काम तीन महिला कर्मचाºयांसह अवघे १४ कर्मचारी करीत आहेत. तर चतुर्थश्रेणी कर्मचाºयाच्या माथी उद्यान विभागाची प्रमुख जबाबदारी असलेल्या उद्यान निरीक्षकाचा भार देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सिडको प्रभागात एकूण सहा प्रभागमिळून २४ नगरसेवक आहेत. सहा प्रभागांचा समावेश असलेल्या एवढ्या मोठ्या भागात मनपाची एकूण ८० हून अधिक उद्याने असून यातील सुमारे ५० उद्यानांची खासगी ठेकेदारामार्फत (वरवर) देखभाल करण्यात येते. तरी अजून ३० हून अधिक उद्यानांची देखभाल करण्याची जबाबदारी ही मनपाच्या कर्मचाºयांकडे आहे. या कर्मचाºयांना उद्यानांमध्ये साचलेली घाण, वाढलेले गाजरगवत काढण्याबरोबरच उद्यानांची देखभाल करणे तसेच मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर असलेल्या पथदीपांवर, रस्त्याला अडथळा ठरणाºया फांद्या काढणे, वाहतूक बेट व दुभाजक स्वच्छता करणे आदी कामे प्रामुख्याने या विभागाने करणे गरजेचे असतानाही या विभागातील अधिकारी व कर्मचारी मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. उद्यानांची देखभाल करण्यासाठी ५० हून अधिक कर्मचारी मनपाकडे असणे गरजेचे असताना यासाठी अवघे १४ कर्मचारी हे काम करीत असल्याने त्यांच्याकडून हे कामकाज पूर्ण होत नसल्याचे सिडकोतील उद्यानांची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, सिडकोतील बहुतांशी ठिकाणच्या मुख्य रस्त्यांवरील झाडांच्या फांद्या वाढल्या असून, या फांद्यामुळे पथदीप झाकले गेले असल्याने रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरून अपघात होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे.