शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

आठवडे सण बाजारात मोठी उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 00:44 IST

वणी : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाली.

ठळक मुद्देवणी : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीदारांची गर्दी

वणी : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाली.निफाड, चांदवड, कळवण, सटाणा व दिंडोरी तालुक्यातील विविध व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती. किराणा व कापड दुकाने यातच जास्त गर्दी जाणवत होती. इतर व्यवसायामध्ये तुलनात्मक वर्दळ कमी जाणवत असली तरी त्या व्यावसायिकांचा समाधानकारक व्यवसाय झाला. भूतकाळात कोरोनाच्या महामारीमुळे अनेक महिने आठवडेबाजार बंद होता.अनेक व्यापारी शेतकरी विविध व्यावसायिकांची मोठी आर्थिक हानी झाली होती, तर काहींचे आठवडे बाजार हे उदरनिर्वाहाचे साधन असल्याने उपासमारीला सामोरे जावे लागले होते.अनेक लोकांच्या उदरनिर्वाहाचा साधन असलेल्या आठवडे बाजारास गतवैभव प्राप्त झाले, त्यात मंगळवारी सण बाजाराच्या निमित्ताने सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, व्यावसायिक उलाढाल वाढल्याचे जाणवत असल्याने काही प्रमाणात कोरोनामुळे झालेल्या नुकसानीची तीव्रता कमी झाल्याचा दिलासा सणबाजारामुळे मिळाला तसेच शहरातील कापड, किराणा, रांगोळी व सजावटीच्या वस्तूंची दुकाने तसेच खाद्यपदार्थ तयार करून देणाऱ्या राजस्थानी आचारी यांच्याकडेही गर्दी होत आहे.कोरोनाचे संकट जिवावर बेतू नये, त्याचा संसर्ग होऊ नये नागरिकांवर याचा प्रतिकूल परिणाम होऊ नये हा शासनाचा सकारात्मक दृष्टिकोन त्याचे तंतोतंत पालन करण्यासाठी प्रयत्न ग्रामपालिका स्तरावर करण्यात आला होता. दरम्यान कोरोनाचा प्रभाव व प्रादुर्भाव सध्या नियंत्रणात आहे. त्यामुळे शासनस्तरावर नियम व सूचनांचे पालन करत आठवडेबाजार सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. वणीचा आठवडे बाजार मंगळवारी वणी - पिंपळगाव रस्त्यावर भरतो. सुमारे शंभर खेडेपाडे येथील ग्रामस्थ खरेदी-विक्रीसाठी येतात. धान्य, कपडे, पादत्राणे, किराणा, मसाले, भाजीपाला, फळे, भेळभत्ता याबरोबर इतर व्यावसायिक आपली दुकाने लावतात मोठी आर्थिक उलाढाल होते.

टॅग्स :DiwaliदिवाळीBaazaarबाजार