शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वर्षी संकेतस्थळाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 02:02 IST

औंदाणे : काही मुलांच्या अंगी जन्मजात हुशारी असते. केवळ त्यांच्या या हुशारीला योग्य दिशा देण्याची गरज असते. मूळची उत्राणे (ता. बागलाण) येथील रहिवासी असलेल्या व सध्या सटाण्यात वास्तव्यास असलेल्या आदिश्री अविनाश पगार हिने वयाच्या सातव्या वर्षीच संकेतस्थळाची (वेबसाइट) निर्मिती करत लक्षवेधक कामगिरी केली आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून तिने पाणीबचतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्देआदिश्रीची कामगिरी पाणीबचतीचा दिला संदेश

औंदाणे : काही मुलांच्या अंगी जन्मजात हुशारी असते. केवळ त्यांच्या या हुशारीला योग्य दिशा देण्याची गरज असते. मूळची उत्राणे (ता. बागलाण) येथील रहिवासी असलेल्या व सध्या सटाण्यात वास्तव्यास असलेल्या आदिश्री अविनाश पगार हिने वयाच्या सातव्या वर्षीच संकेतस्थळाची (वेबसाइट) निर्मिती करत लक्षवेधक कामगिरी केली आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून तिने पाणीबचतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.आदिश्रीने उन्हाळ्याच्या शालेय सुट्यांत आमीर खान व किरण राव प्रस्तुत ‘तुफान आलंया’ या पानी फाउंडेशनच्या कार्यक्र माने प्रेरित होऊन संकेतस्थळाची निर्मिती केली. या संकेतस्थळातून पाणी वाचविणे व पाण्याचे महत्त्व याविषयीचा संदेश आदिश्रीने छायाचित्रे व व्हिडीओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.वयाच्या पाचव्या वर्षापासून संकेतस्थळ बनविण्यासाठी लागणाऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा अभ्यास तिने सुरू केला होता. तसेच संकेतस्थळ बनविण्यासाठी बी. ई. कॉम्प्युटर तृतीय वर्ष अभ्यासक्रमातील वेब प्रोग्रामिंगचे ज्ञान तिने अवगत केले. संकेतस्थळ बनविण्याचा खडतर प्रवास आदिश्रीने तिच्या कुशाग्र बुद्धिमत्ता व कठोर मेहनतीच्या जोरावर वयाच्या सातव्या वर्षी लीलया पार पाडला. पानी फाउंडेशनच्या टीमकडूनही आदिश्रीचे या उपक्र माबद्दल कौतुक करण्यात आले आहे. तसेच भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.तिला संकेतस्थळ बनविण्याची संकल्पना आई अंजली पगार यांच्याकडून मिळाली आणि वडील अविनाश पगार यांच्याकडून मार्गदर्शन लाभले. नानासाहेब निंबाजी पगार यांची आदिश्री ही नात आहे. लहान वयात मिळवलेल्या या यशाबद्दल व सामाजिक जाणिवेसाठी आदिश्रीचे समाजातून कौतुक होत आहे. संगणक क्षेत्रातील तज्ज्ञांनीही आदिश्रीच्या या कामगिरीबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.आमीर खानला भेटण्याची इच्छा४पाणी वाचविण्याच्या उपक्र माबरोबरच भविष्यात आमीर खान व किरण राव यांना भेटण्याची इच्छा आदिश्रीने बोलून दाखवली आहे. पानी फाउण्डेशनच्या काही निवडक व्हिडीओंचा समावेश या संकेतस्थळात करण्यात आला आहे. अभ्यासाबरोबरच अवकाशविषयी वाचन, पियानो वाजवणे, लिखाण करणे, विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणे ही आदिश्रीची आवड आहे.सदर संकेतस्थळाला भारताबरोबरच जगभरातील अमेरिका, जर्मनी, पेरू, सौदी अरेबिया व नेदरलॅँड या देशांतून भेट देण्यात आली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी