शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागडे येथे विणकरांसाठी सहयोग शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:09 IST

भारत सरकार वस्त्र मंत्रालय आणि विणकर सेवा केंद्र मुंबई यांच्या वतीने पैठणीच्या गुणवत्तेसह विणकरांचे जीवनमान उंचावे या हेतूने येवला शहर व तालुक्यातील पैठणी विणकरांसाठी नागडे येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात हस्तकला सहयोग शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

येवला : भारत सरकार वस्त्र मंत्रालय आणि विणकर सेवा केंद्र मुंबई यांच्या वतीने पैठणीच्या गुणवत्तेसह विणकरांचे जीवनमान उंचावे या हेतूने येवला शहर व तालुक्यातील पैठणी विणकरांसाठी नागडे येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात हस्तकला सहयोग शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी वस्त्रोद्योग मंत्रालयातील सहायक संचालक आर. एस. परमार, येवला विधानसभा विस्तारक अण्णासाहेब सावंत, राष्ट्रस्तरीय मुक्त विद्यालयाचे विभागीय संचालक अशोक कुमार, राष्ट्रीय हातमाग विकास महामंडळाचे संचालक उपेंद्र बहिरे, संत कबीर पुरस्कार विजेते शांतिलाल भांडगे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते रमेशसिंग परदेशी यांच्यासह येवला बँक आॅफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक सोमासे, उद्योजक बाळासाहेब कापसे, भाजपा कार्यकारिणी सदस्य गोरख खैरनार, भाजपा शहराध्यक्ष आनंद शिंदे, तालुकाध्यक्ष राजूसिंग परदेशी उपस्थित होते.  सहायक संचालक वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकार आर. एम. परमार यांनी प्रास्ताविक केले. पैठणीची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी रेशमाची रंगनी, आणि सफाई व कलात्मक दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत परमार यांनी व्यक्त केले.  पैठणी राज्य व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शांतीलाल भांडगे, रमेशसिंग परदेशी यांच्यासह दुर्गा माहूलकर प्रणीता परदेशी, कृष्णकांत दिवटे, विनोद जाधव, अण्णा अभंग, केशव धिवर, साहेबराव पगारे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.  विणकर सेवा केंद्र मुंबईच्या वतीने आयोजित या शिबिरामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आणि नॅशनल ओपन स्कूल येथील विणकर अभ्यासक्रमासाठी पंजीकरण करण्याबाबत माहिती देण्यात आली. कुशल विणकरांसाठी हातमाग आणि इतर साहित्य खरेदीसाठी मिळणारे अनुदान हे नोंदणीकृत विणकरांना देणार असल्याने विणकरांनी तत्काळ नोंदणी करावी. तसेच काही समस्या असल्यास विणकर सेवा केंद्राशी संपर्कसाधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक