शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘आम्ही सरकारला शौर्य पदक, सेना मेडल परत करू...’ शासन दारी आले अन् न भेटताच निघून गेले; वीरपत्नी, वीरमाता संतप्त

By अझहर शेख | Updated: July 15, 2023 20:08 IST

जिल्हा माजी सैनिक कल्याण कार्यालयाकडून आलेल्या निमंत्रणावर सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेच्या उद्घाटन सोहळ्याला नाशिक जिल्ह्याच्या वीरनारी वीरमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या महिला पदाधिकारी, सदस्य उपस्थित होत्या.

नाशिक : जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरमातांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली नाही. जिल्हा प्रशासनाकडून प्रलंबित राहिलेल्या शहिदांच्या कुटुंबियांना शासकिय जमीन देण्याबाबतच्या प्रलंबित प्रकरणांविषयीचे आमचे गाऱ्हाणे ऐकले घेतले नाही, असा आरोप वीरपत्नी, वीरमातांनी केला आहे. शहिदांच्या कुटुंबियांची भेट टाळणे हे त्यांच्या बलिदानाचा अपमान असून त्यांना मिळालेल्या शौर्य पदक, सेना मेडल हे आम्ही सरकारकडे परत करू....’ अशी भावना वीरपत्नींनी उद्विगणतेने बोलून दाखविली.

जिल्हा माजी सैनिक कल्याण कार्यालयाकडून आलेल्या निमंत्रणावर सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेच्या उद्घाटन सोहळ्याला नाशिक जिल्ह्याच्या वीरनारी वीरमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या महिला पदाधिकारी, सदस्य उपस्थित होत्या. या सोहळ्याला उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा विद्यमान सार्वजनिक खात्याचे मंत्री दादा भुसे यांनी भेट घेतली नाही. तसेच माजी सैनिकी जिल्हा कल्याण कार्यालयानेही वीरनारी, वीर पत्नींची भेट घडवून आणण्याबाबतचे प्रयत्न यावेळी केले नाही, असा आरोप संस्थेच्या जिल्हाध्यक्ष वीरपत्नी रेखा खैरनार यांनी केला. यावेळी वीरनारी वीरमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून वीरपत्नी कल्पना रौंदळ, नीता जाधव, कमल लहाने, शैला पाचरने, सविता लांडगे, दिपाली पाटील, सीमा चांदोरे, यांच्यासह वयोवृद्ध वीरमाता कृष्णाबाई बोडके, बाळूबाई सोनवणे यांनी जाहिर नाराजी व्यक्त केली.

म्हणून घेणार होते भेट!जिल्ह्यातील वीर पत्नींना शासनाकडून जमीन कसण्यासाठी दिली जाणार होती. एकुण २५पैकी केवळ ५ वीरपत्नींचे प्रकरणे जिल्हा प्रशासनाने निकाली काढली आहेत; उर्वरित फायली अद्यापही धूळखात पडलेल्या असून त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही गाऱ्हाणे मांडून निवेदन देणार होतो; मात्र त्यांनी आमची भेट घेतलीच नाही, असे खैरनार यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक