शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात न्यायाचे सरकार स्थापन करू- आदित्य ठाकरे

By श्याम बागुल | Updated: July 20, 2019 18:10 IST

नाशिकच्या पवित्र भूमीत १९९४ मध्ये शिवसेनेचे महाअधिवेशन झाल्यानंतर राज्यात १९९५ मध्ये युतीची सत्ता स्थापन होऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर विराजमान झाले होते. त्यामुळे नाशिकच्या या भूमीतूनच आपण जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो

ठळक मुद्देआदित्य ठाकरे : जनआशीर्वाद यात्रेचे आगमनतुम्ही सर्व आशीर्वाद देण्यास तयार आहात काय? असा सवालही त्यांनी केला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पाच वर्षे सत्तेत असताना शिवसेनेने अनेक प्रश्नांवर लढा दिला, आंदोलने केली त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत युतीला यश मिळू शकले, असा दावा करून शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपली जनआशीर्वाद यात्रा स्वत:ला महाराष्टÑाचा मुख्यमंत्री म्हणून पुरस्कार करण्यासाठी नव्हे तर ज्यांनी लोकसभा निवडणुकीच्या यशात हातभार लावला त्यांचे आभार मानण्यासाठी काढली असून, महाराष्टÑात सुजलाम् सुफलाम् व न्याय देणारे सरकार स्थापन करण्यासाठी सर्वांची साथ मागण्यासाठी आपण आलो असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात आयोजित विजयी संकल्प सभेत आदित्य ठाकरे बोलत होते. ठाकरे यांनी नेहमीच्या राजकीय सभेप्रमाणे व्यासपीठावरून मार्गदर्शन न करता थेट उपस्थितांमध्ये खुर्चीवर उभे राहून संवाद साधला. ते म्हणाले, नाशिकच्या पवित्र भूमीत १९९४ मध्ये शिवसेनेचे महाअधिवेशन झाल्यानंतर राज्यात १९९५ मध्ये युतीची सत्ता स्थापन होऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर विराजमान झाले होते. त्यामुळे नाशिकच्या या भूमीतूनच आपण जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो असून, तुम्ही सर्व आशीर्वाद देण्यास तयार आहात काय? असा सवालही त्यांनी केला. नव महाराष्टÑ घडविण्यासाठी आपण ही यात्रा काढली असून, त्यात किती किलोमीटरचा प्रवास व किती दिवस लागतील हे मोजण्यापेक्षा या यात्रेच्या निमित्ताने आपल्याला किती आशीर्वाद मिळतात, हे पाहण्यासाठी आपण गावोगावी जात आहोत. गेल्या पाच वर्षे केंद्रात व राज्यात सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेने जनसामान्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलन केली, आवाज उठविले अशा आंदोलनकर्त्यांचे आभार मानायला आपण यात्रा काढली असून, त्यामुळे लोकसभेत युतीला यश मिळू शकले, असा दावाही ठाकरे यांनी केला.महाराष्टÑावर भगवा फडकविण्यासाठी, तसेच महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करण्याबरोबरच, तुमच्या-आमच्या न्यायाचे सरकार स्थापन करण्यासाठी आपली जनआशीर्वाद यात्रा असून, स्वत:ला मुख्यमंत्री होण्यासाठी नव्हे असे स्पष्टीकरण देऊन आदित्य ठाकरे यांनी उपस्थिताना हात उंचावून साथ देण्याचे आवाहन करताच, सर्वांनी हात उंचावून प्रतिसाद दिला.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकShiv Senaशिवसेना