शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रोजगाराची संधी आम्ही देऊ सोनं तुम्ही करा-मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 12:58 IST

ओझर-आजच्या युगात शिक्षणापेक्षा कौशल्य महत्त्वाचे असून कौशल्य समोर आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी संधी आम्ही देऊ त्याचे सोने तुम्ही करा. आज राज्यात उद्योग मोठ्या प्रमाणात येत असताना त्यांना हवे तसे रोजगार आम्ही बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध करत आहोत.

ओझर-आजच्या युगात शिक्षणापेक्षा कौशल्य महत्त्वाचे असून कौशल्य समोर आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी संधी आम्ही देऊ त्याचे सोने तुम्ही करा. आज राज्यात उद्योग मोठ्या प्रमाणात येत असताना त्यांना हवे तसे रोजगार आम्ही बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध करत आहोत.आमदार अनिल कदम यांच्या प्रयत्नाने झालेल्या महारोजगार मेळाव्याला सुमारे बारा हजार युवक यवतींना संबोधित करताना ते बोलत होते.सुरवातीला दीपप्रज्वलन झाल्यानंतर प्रास्ताविक औद्योगिक विकास महामंडळाचे सचिव हर्षदीप कांबळे यांनी केले तर कदम यांनी रूपरेषा व सदर मेळावा भरवण्यामागचे उद्दिष्ठय नमूद केले. यावेळी फडणवीस म्हणाले, जसे मुंबई पुणे हा कॉरिडॉर एक झाला तसाच नाशिक मुंबई हा देखील सर्वच दृष्टीने एक होणार असून त्यासाठी समृद्धी महामार्ग रोजगार व औद्योगिक दृष्ट्या कसा वरदान ठरणार असून इंडस्ट्रियल ट्रँगलमध्ये नाशिक हा महत्वाचा टप्पा असल्याचे सांगितले.ड्रायपोर्ट झाल्यानंतर हजारो बेरोजगारांना संधी उपलब्ध होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार हरिश्चंद्र चव्हाण आमदार डॉ.राहुल अहेर, देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी बी.राधाकृष्णन, पोलीस महासंचालक छेरिंग दोरजे, अधीक्षक संजय दराडे, महाराष्ट्र चेंबर कमिटीचे अध्यक्ष आशिष नहार, जिल्हापरिषद अध्यक्ष शीतल सांगळे, कामगार संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे यासह शासनाच्या विविध खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक