शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
2
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
3
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
4
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
5
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
6
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
7
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
8
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
9
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
10
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
11
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
12
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
13
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
14
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
15
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
16
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
17
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
18
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
19
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
20
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
Daily Top 2Weekly Top 5

हम लोग मुहब्बत वाले हैं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 01:01 IST

तुम अपने अकीदो के नेजे हर दिल में उतारे जाते हो, हम लोग मुहब्बत वाले हैं, खंजर क्यों लहराते हों..., तहजीबो के लाखो फल आ जायेंगे, उर्दू का एक दरख्त लगा दो बस्ती में..., मुख्तसर दे दें, मोतेबर दे दें, इस तरह का हुनर दे दें..., अशा एकापेक्षा एक सरस उर्दू शेरोशायरीने ‘हमसफर’मध्ये उर्दू अदबची मैफल (मुशायरा) उत्तरोत्तर रंगली.

नाशिक : तुम अपने अकीदो के नेजे हर दिल में उतारे जाते हो, हम लोग मुहब्बत वाले हैं, खंजर क्यों लहराते हों..., तहजीबो के लाखो फल आ जायेंगे, उर्दू का एक दरख्त लगा दो बस्ती में..., मुख्तसर दे दें, मोतेबर दे दें, इस तरह का हुनर दे दें..., अशा एकापेक्षा एक सरस उर्दू शेरोशायरीने ‘हमसफर’मध्ये उर्दू अदबची मैफल (मुशायरा) उत्तरोत्तर रंगली.निमित्त होते, नंदकिशोर भुतडा फाउंडेशनच्या वतीने गंगापूररोडवरील ‘हमसफर’मध्ये आयोजित ‘सहिफा-ए-मुहब्बत’ या उर्दू पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे. रविवारी (दि.२१) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यानिमित्ताने जिल्ह्यातील मालेगाव, धुळे, जळगाव, भुसावळ, बुरहानपूर, मुंबई, पुणे आदी शहरांमधून उर्दू शायर उपस्थित होते. मंचावर अध्यक्षस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अधीक्षक सुनील कडासने, तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल, पार्वतीबाई भुतडा, शकील हसरत, डॉ. इकबाल बर्की आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कडासने यांनी ज्येष्ठ शायर इकबाल अशर यांनी लिहिलेली ‘उर्दूू हैं मेरा नाम, मैं खुसरौ की पहेली, मैं मीर की हमराज, गालीब की सहेली...’ ही गझल सादर करून उर्दू भाषेचा प्रवास अधोरेखित केला.तसेच त्यांनी हम लोग मुहब्बत वाले हैं..., ही गझल सादर करून उपस्थितांची दिलखुलास दाद मिळविली. यावेळी कवी राम पाठक, ज्येष्ठ उर्दू शायर आदम मुल्ला, जावेद अन्सारी, जिया बागपती, शकील हसरत, प्रास्ताविक अ‍ॅड. नंदकिशोर भुतडा यांनी केले. सूत्रसंचालन हारून उस्मानी यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व परिचय सानवी भुतडा हिने केले व आभार शौनक भुतडा याने मानले.गझलांनी असा रंगला मुशायराज्येष्ठ शायर नासिर शकेब यांनी देख लीया ना लोगो तुमने मैने उजाले मांगे थे, रौशन हो गयी सारी बस्ती लेकिन हो गया अंधा मैं..., यकीन किजीये वो लोग अब भी मेरी नजर में बुरे नहीं हैं, जिन्होने चुन-चुन के लफ्ज फेके हैं जिंदगीभर खराब मुझपर..., खान अफसर यांनी किसे मै अपना बनाता, विसाल से पहले..., तर जुबेर अली ताबीश यांनी मैं क्या बताऊं वो कितने करीब हैं मेरे, मेरा खयाल बी उसको सुनाई देता हैं..., नदीम मिर्झा यांची इस तरह का हुनर दे दे... ही रचना दिलखुलास दाद घेऊन गेली. अहद अमजद यांनी खोलकर जो बैंठे हैं, गीबतो के दरवाजे..., मैं इधर आउंगा और आके उधर जाऊंगा, हाय ये दश्ते तमन्ना, यहीं मर जाऊंगा... या गझला सादर करून मुशायरा रंगतदार केला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक