शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘हम सब भारतीय हैं, अपनी मंजील एक हैं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:35 IST

‘हम सब भारतीय हैं, अपनी मंजील एक हैं’ या एनसीसी गीताचे सामूहिक गायन करत गोखले एज्युकेशन सोसायटी संस्थेने या उपक्रमाची ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये नोंद केली आहे. रविवारी (दि. २६) एचपीटी महाविद्यालयातील मैदानावर एनसीसी दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देउपक्रमाची ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये नोंद एनसीसी गीताचे सामूहिक गायनशतकपूर्ती वर्षानिमित्त आयोजित उपक्रम

नाशिक : ‘हम सब भारतीय हैं, अपनी मंजील एक हैं’ या एनसीसी गीताचे सामूहिक गायन करत गोखले एज्युकेशन सोसायटी संस्थेने या उपक्रमाची ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये नोंद केली आहे. रविवारी (दि. २६) एचपीटी महाविद्यालयातील मैदानावर एनसीसी दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोखले एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त तसेच या संस्थेच्या परळ येथील आर. एम. भट हायस्कूलच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त ‘गुरुदक्षिणा’ या माजी विद्यार्थी संघाकडून राष्ट्रीय छात्र सेना दिनानिमित्त या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोएसोच्या नाशिकसह नाशिकरोड, ओझर तसेच परळ आणि बोर्डी येथील महाविद्यालयांमध्ये एकाचवेळी एनसीसीचे सामूहिक गीत गाण्यात आले. एकूण पाच ठिकाणी झालेल्या या उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक यांच्यासह एनसीसीच्या २० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये याची नोंद केली आहे. कॉलेजरोड येथील एचपीटी कॉलेजच्या जिमखान्यासमोरील मैदानावर झालेल्या भव्य कार्यक्रमात माजी एनसीसी विद्यार्थी कॅडेट्स, एनसीसी प्रमुखपद भूषवलेले अधिकारी अशा दहा जणांंना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.  या कार्यक्रमावेळी सरकारवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. जी. रोहकले यांनी उपस्थित एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शालेय जीवनापासून एनसीसीचे प्रशिक्षण आवश्यक असून, या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशाप्रती निष्ठा निर्माण होते, तसेच विद्यार्थ्यांमध्ये संघटन भावना मजबूत होऊन स्वयंशिस्त आणि संरक्षणाची भावना वाढीस लागत असल्याचे सांगितले. आस्थापना विभागाचे शैलेश गोसावी यांनी शतकपूर्ती वर्षानिमित्त आयोजित या उपक्रमाची उपस्थिताना माहिती दिली.  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गोएसो संस्थेचे शाखा सचिव आर. पी. देशपांडे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रकल्प संचालक डॉ. प्रदीप देशपांडे, फार्मसी महाविद्यालयाचे संचालक डॉ. कल्पेश गोसावी, एचपीटी आरवायके महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, बीवायके कॉमर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनेश कलाल आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन एचपीएटी महाविद्यालयातील एनसीसी अधिकारी मेजर विष्णू उगले, बीवायके महाविद्यालयातील एनसीसी अधिकारी लेफ्टनंट देवेंद्र भवारी यांनी केले होते.  कार्यक्रमाची सांगता भारतमातेचा जयघोष करत आणि २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यात शहीद झालेले जवान आणि मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. भट कॉलेजमध्येही उपक्रमाची रेलचेल गोखले एज्युकेशन सोसायटीच्या परळ येथील आर. एम.भट महाविद्यालयातदेखील एनसीसी दिनानिमित्त सामूहिक एनसीसी गीत गायन कार्यक्रमात राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांच्यासह एनसीसीचे विविध अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गुरुदक्षिणा या माजी विद्यार्थी संघाने पुढाकार घेत राबविलेल्या या उपक्र मात शस्त्रास्त्रे, युद्धसामग्री आणि कॅडेट्सने बनविलेल्या मॉडेल्यचे प्रदर्शन, संचलन स्पर्धा, प्रश्नमंजुषा अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :educationशैक्षणिकairforceहवाईदल