शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

वावीच्या दुसऱ्या महिलेला संधी

By admin | Updated: September 16, 2014 00:22 IST

वावीच्या दुसऱ्या महिलेला संधी

वावी : वावीच्या रहिवासी व पांगरी गणाच्या सदस्य संगीता विजय काटे या महिलेला पंचायत समितीच्या सभापतिपदी विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी गावातील सुवर्णा दशरथ अहेर यांना सुमारे वर्षभरासाठी पंचायत समितीचा कारभार करण्याची संधी मिळाली होती. सौ. अहेर यांच्यानंतर संगीता काटे या वावीच्या महिलेला पंचायत समितीच्या सभापतिपदी विराजमान होण्याचे भाग्य लाभले आहे. विकासकामांसाठी ग्रामीण भागाचा राबता असणाऱ्या व तालुकापातळीवर मिनीमंत्रालय म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पंचायत समितीचा कारभार हाती घेण्यासाठी मोठी स्पर्धा असते. त्यामुळे पंचायत समितीच्या सभापतिपदी विराजमान होण्याचे संधी महिलांना केवळ आरक्षणामुळे मिळते. या आरक्षणाच्या संधीतूनच वावीच्या दोन महिलांना पंचायत समितीचे सभापतिपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी पंचायत समितीच्या सभापती व पांगरी गणाच्या सदस्य गुणिता निकम यांचे निधन झाल्याने या जागेवर निवडणूक घेण्यात आली होती. त्यावेळी अनुसूचित जातीच्या महिलेसाठी सभापतिपदी राखीव होते. सभापतिपद अनुसूचित जागेसाठी राखीव असल्याने पांगरी गणात झालेल्या पोटनिवडणूक विजयी झालेल्या वावीच्या सुवर्णा अहेर वर्षभरासाठी थेट सभापतिपदी विराजमान झाल्या होता. त्यानंतर सुमारे तीन वर्षांच्या काळानंतर येथील माजी सरपंच व विकास संस्थेचे अध्यक्ष विजय काटे यांच्या पत्नी सौ. संगीता काटे यांना सभापतिपद मिळाले आहे. आगामी अडीच वर्षांच्या काळासाठी सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. सभापतिपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने कॉँग्रेसमध्ये मोठी स्पर्धा होती. अशा परिस्थितीही सौ. संगीता काटे यांची सभापतिपदी वर्णी लागली. काटे यांच्या निवडीमुळे वावीकरांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची जोरदार आतषबाजी करीत सौ. काटे यांच्या निवडीचे वावीकरांनी स्वागत केले. (वार्ताहर)